शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ते बेल्जिअन डॉक्टर म्हणतात, वाटलं होतं की मरणार मी!

By meghana.dhoke | Updated: April 21, 2020 16:07 IST

उपचार करता करता स्वत: कोरोनबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडय़ांची झूंज

ठळक मुद्देबेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्युह आखलाय

जगण्याचे आनंद छोटे असतात आणि तेच महत्वाचे आणि अस्सल असतात हे माणसाला जाणवायला लागलं तो हा काळ. डॉक्टरची ही गोष्ट. ब्रसेल्स शहरातली. डॉ. अॅण्टोनी ससेन,  वय वर्षे 58. मुत्रविकारतज्ज्ञ. आजवर अनेक रुग्ण पाहिले. मरण काही पाहिलं नव्हतं असं नाही, मात्र बेल्जिअममध्ये कोरोनानं उडवलेला हाहाकार सगळ्यानांच विषण्ण करुन टाकणारा आहे.त्याला हे डॉक्टरही अपवाद नाही. ते आणि त्यांचे सहकारी श्वसनविकार, त्यातून मुत्रशयाचे होणारे विकार यासाठीचे उपचार करत होतेच.मात्र त्याचकाळात त्यांना कोरोनानं गाठलं.लागण झाली. आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं.पण कोरोनाशी ही लढाई ते जिंकले आणि कालच त्यांना अतीदक्षता कक्षातून बाहेर आणण्यात आलं.त्यानंतर डेल्टा कायरॅक हॉस्पिटल जिथं ते काम करतात, तिथूनच त्यांनी परिजनांसह सर्वांशीच व्हिडीओ संवाद साधला.ते सांगतात, ‘ मलाही एका क्षणी वाटलं होतं की, संपलं, आता आपण मरणार! आता या काळझोपेतून आपण कधीही उठणार नाही! मात्र एकीकडे असं वाटणं दुसरीकडे मी मनात स्वत:ला सांगत होतो की, उठ, जागा हो, तूला जगायचं आहे. कामं आहेत, तू असा झोपून कसं चालेल.’ही जगण्यामरण्याची झुंज अंतिमत: ते जिंकले आणि उठून बसले.तो उठून बसण्याचा, पहिल्यांदा डोळे उघडण्याचा अनुभव ते सांगतात, ‘ आजवर आयुष्यात मला कधीही इतका आनंद झाला नव्हता, मी डोळे उघडले तर समोर माङो सहकारी डॉक्टर उभे होते. त्यांचे हसरे चेहरा पाहिले, शब्दात नाही सांगता येणार काय वाटलं. विलक्षण होतं ते! मी जगलो, जागा झालो ते कसं असा विचार केला तर वाटतं एकीकडे मरण उभं होतं. माङो वडील चार वर्षापूर्वी गेले, ते मला दिसले, मी त्यांच्याशी बोलत होतो. दुसरीकडे मला वाटत होतं की, हा आपला रस्ता नाही. आपल्याला जगायचं आहे.’जगण्यामरण्याची सीमा ओलांडून ते आले आणि ते सा:या जगाला एकच गोष्ट सांगतात, ‘ आता एकच इच्छा आहे, एकदा माङया कुटुंबाला कडकडून मीठी मारायची आहे. मला लागण झाली तसं मी त्यांना फक्त लांबून पाहतो आहे. आता बरा झालो की मी त्यांना मीठी मारणार आहे.’ैआपली माणसं, ती सोबत असणं, त्यांचा स्पर्श, त्यांना मिठी मारुन सांगणं की मी आहे, तुम्ही आहात माङयासाठी हे सारं किती मोलाचं असतं, पण एरव्ही त्याची किंमत नसते. ती मरणाच्या दारात या डॉक्टरांनाच नाही आता सगळ्यांना कळते आहे.बेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्युह आखलाय, 38,496 जणांना बाधा झाली तर 5,638 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.जगण्याची लढाई अखंड चालू आहे.