शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

CoronaVirus News: चीनमध्ये पुन्हा आढळू लागले कोरोनाचे रुग्ण; बीजिंगच्या काही भागांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:52 IST

बीजिंगमध्ये संसर्ग; साथीने पुन्हा डोके वर काढले, नवे सहा रुग्ण आढळल्याने काही भागांत केले लॉकडाऊन

बीजिंग : कोरोना साथीवर विजय मिळविल्याचे चीनचे दावे फोल असल्याचे दिसून येत आहे. बीजिंगमध्ये कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले असून त्यामुळे तेथील काही भागांत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.या घटनेमुळे चीनमध्ये कोरोनाच्या साथीने पुन्हा डोके वर काढल्याचे सांगितले जात आहे. बीजिंगमधील फेंगताई जिल्ह्यातील ११ वसाहतींमधील लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या वसाहतीजवळच मटण मार्केट आहे. तिथून कोरोनाच्या विषाणूचा माणसांना संसर्ग झाल्याची चर्चा आहे.गेल्या दोन महिन्यांत बीजिंगमध्ये प्रथमच कोरोनाचा रुग्ण गुरुवारी आढळून आला होता. तो गेल्या आठवड्यात शीनफादी येथील मटण मार्केटमध्ये जाऊन आला होता. ही व्यक्ती गेल्या काही महिन्यांत बीजिंग शहराबाहेर गेलेली नाही.चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गास सुरूवात झाली व नंतर ही साथ अनेक देशांत पसरली. जगभरात ७७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ४ लाखांहून जास्त लोकांचा बळी गेला आहे. चीनने वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू बनविला असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावरून चीन व अमेरिकेमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. चीनने मात्र याबाबत स्पष्टीकरण दिले होते की, कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यानंतर हा विषाणू नेमका कुठे आढळला आणि कसा निर्माण झाला, याची चौकशी करता येईल. तसेच ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्याबाबतही सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर केला जाईल. सध्या कोरोनाच्या संकट काळात रुग्ण बरे करण्याला प्राधान्य असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)सामूहिक चाचणी सुरूवुहानमध्ये कोरोनाची साथ पसरल्यानंतर चीनमधील अनेक प्रांतातही त्याची लागण झाली होती. मात्र त्या देशाने अतिशय कडक निर्बंध लादून ही साथ आटोक्यात आणल्याचा दावा केला होता. मात्र बीजिंगमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने आता चित्र पालटले आहे. स्थानिक नागरिकांमधूनच या विषाणूची बीजिंगमध्ये लागण झाल्याने प्रशासन हादरले आहे. बीजिंगच्या संसर्गग्रस्त भागातील नागरिकांची सामूहिक चाचणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन