शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी बांगलादेशातील पोलिसांचा योगाभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 23:29 IST

२४ जणांचा मृत्यू व ७,००० जणांना झाली लागण; यापूर्वी ३०० जणांनी घेतले प्रशिक्षण

ढाका : बांगलादेशातील पोलिसांनी आपले अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यास वर्ग सुरू केला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तसेच त्यांना तणावमुक्त राखण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्टÑीय योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात येत असून, यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे बांगलादेशात तसेच सर्वत्र रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचे औचित्य आणखी वाढले आहे.बांगलादेशात कोरोना संक्रमणामुळे २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे व ७,००० इतर सुरक्षा कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. चांसरी विभागाचे उपायुक्त अशरफुल इस्लाम यांनी म्हटले आहे की, ढाका महानगर पोलिसांच्या (डीएमपी) ३०० कर्मचाºयांनी यापूर्वीच योगाभ्यास केलेला आहे. आम्ही या सुरक्षा कर्मचाºयांसाठी ७ जून रोजीच योगाभ्यास वर्ग सुरू केलेला आहे.सरकारी संवाद समिती बीएसएसने दिलेल्या वृत्तानुसार, अशरफुल यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाºयांचे मनोबल तसेच त्यांची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. डीएमपीच्या १,००० पोलीस कर्मचाºयांना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योगामुळे सुरक्षा कर्मचाºयांचे मानसिक आरोग्य तसेच त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे.बांगलादेशातील अनेक पोलीस कर्मचारी स्वत: व त्यांचे कुटुंबीय कोरोनामुळे संक्रमित झाल्याच्या शंकेने त्रस्त आहेत. त्यातील अनेकांना झोप येत नाही व भूकही लागत नाही. मात्र, योगाभ्यासाने त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत मिळण्याबरोबरच त्यांना आनंदी राहून काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.पंतप्रधानांचे खाजगी आरोग्य सल्लागार डॉ. ए.बी.एम. अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, योगाभ्यासामुळे मानसिक शक्ती वाढण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हेच सर्वांत जास्त गरजेचे आहे. बांगलादेशात आतापर्यंत ९८,४८९ लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. त्यातील १,३०५ जणांचा मृत्यू झाला आहे.जगभरात योग दिनानिमित्त आॅनलाईन कार्यक्रम२१ जून रोजी आंतरराष्टÑीय योग दिन साजरा करण्यात येत असून, यंदा कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे जगभरात सर्वत्र आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जगभरात योग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात; परंतु यंदा प्रत्येकाने आपापल्या घरातच राहून योगाभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या दूतावासातर्फेही यंदा आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBangladeshबांगलादेशYogaयोग