शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अमेरिकींना भरली धडकी; किराणा सामान साठवायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 21:15 IST

चीनमध्ये सुरवातीला या व्हायरसने रौद्ररुप धारण केले होते. या व्हायरसने एकट्या चीनमध्येच 3000 च्या आसपास बळी घेतले असून जगभरातही हा आकडा वाढत आहे.

ठळक मुद्देजवळपास 50 हून अधिक देश कोरोनाच्या प्रभावाखाली आले आहेत.अमेरिकेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गेल्या काही आठवड्यापासून चेहऱ्याला हात लावला नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. हळूहळू या व्हायरसची व्याप्ती वाढली असून अमेरिकेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गेल्या काही आठवड्यापासून चेहऱ्याला हात लावला नसल्याचे वक्तव्य केले होते. या मृत्यूंमुळे अमेरिकेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

चीनमध्ये सुरवातीला या व्हायरसने रौद्ररुप धारण केले होते. या व्हायरसने एकट्या चीनमध्येच 3000 च्या आसपास बळी घेतले असून जगभरातही हा आकडा वाढत आहे. जवळपास 50 हून अधिक देश कोरोनाच्या प्रभावाखाली आले आहेत. भारतातही 30 रुग्ण आढळले असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय नौदलासह, हवाई दलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अमेरिकेमध्ये गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे 11 जण दगावले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी घरातच राहण्याची वेळ आली तर तयारी करण्यास सुरुवात केली आहे.  अमेरिकेमध्ये 152 जणांना लागण झाली आहे. 

अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यापासून पॅकबंद खान्या पिण्याच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. लोक डबाबंद दूध, फळे, स्नॅक्स आदी वस्तू मोठ्या प्रमाणावर नेत आहेत. याशिवाय हँडवॉश, सॅनिटायझर यांची विक्रीही वाढली आहे. फ्लोरिडा, मियामी, न्यूयॉर्क सारख्या शहरांवर हा धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात तब्बल 1400 पटींनी सॅनिटायझरची मागमी वाढली होती.

टॅग्स :corona virusकोरोनाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प