कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या या संकटातही जगाला एक मोठा आणि वेगळाच अनुभव मिळाला आहे. लॉकडाऊन बर्याच देशांमध्ये केले गेले असले तरी यातून बरेच काही शिकण्यासारखे होते. जवळजवळ प्रत्येक देशाने हे समजून घेतले आहे की, असा धोका पुन्हा उत्पन्न होणार नाही आणि अशा कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीशिवाय संकटावर मात करता येणार नाही. या महारोगराईवर नियंत्रण मिळवणं कठीण असलं तरी अशक्य नाही. तरीही गेल्या काही दिवसांत पाहिलेले बदल कदाचित कायमचे नसतील, परंतु ते आशा पल्लवित करतात. नमस्ते ही पद्धत झाली प्रचलितकोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका हा हातांनी होतो. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर व्हायरस त्याच्या हाताला चिकटतो. अशा परिस्थितीत सामाजिक अंतर राखण्यासाठी सगळ्यांनीच भारताचा नमस्कार केला. आता मिळवणे शक्य नसल्यानं अशा परिस्थितीत भारताने 'नमस्ते' जगाला दिले. दोन्ही हातांनी अभिवादन करण्याची ही पद्धत कोरोनाच्या काळात वाढत गेली. जपानमध्येही अशाच पद्धतीनं शुभेच्छा दिल्या जातात. घरातून काम करणं आता वास्तविकतालॉकडाऊनमुळे कॉर्पोरेट्समधील अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही. लॉकडाऊनमुळे हे स्पष्ट झाले की, बर्याच कामाच्या गोष्टी घरात राहूनही करता येतात. मोठ्या आणि विकसित देशांमध्ये हे प्रचलित होतं, परंतु मुख्य प्रवाहात आलं नव्हतं. कोरोना व्हायरसमुळे घरातून काम करण्याची पद्धत आता प्रचलित झाली आहे. जगात वर्क फ्रॉम होममधून कशा पद्धतीनं काम झालं हे लवकरच आकड्यांमधून समोर येईल. कर्मचारीसुद्धा आता वर्क फ्रॉम होमची कंपनीकडे मागणी करू शकतात. तसेच वर्क फ्रॉम होम हेसुद्धा आता रोजगाराचं एक साधन होऊ शकतं. स्वच्छ हवा, सुंदर आकाशकोरोना विषाणूमुळे जगभरात टाळेबंदी आहे. लोकांना आपल्या घराबाहेर पडणं सोडून दिलं. कारखाने बंद असल्यामुळे धूर हवेत मिसळणे आणि नदीमध्ये केमिकल सोडण्याचा प्रकार थांबला आहे. जेव्हा मनुष्याने निसर्गाला संधी दिली, तेव्हा त्यानंच स्वतःमध्ये स्वच्छ बदल स्पष्टपणे दाखवला. आकाश आता निळाशार दिसू लागला आहे. हवा श्वास घेण्यायोग्य झाली आहे. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. काँक्रिटच्या जंगलांमध्येही आता प्राणी दिसू लागले आहेत. प्रदूषणामुळे निर्माण झालेला वातावरणातील बदल हा गेल्या वर्षी दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना जवळून पाहिला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला कसा फायदा झाला हे सरकार कदाचित शिकेल. अशा निर्णयाची गरज आहे, जे पर्यावरणाचे किमान नुकसान करणार नाहीत. हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता वर्क फ्रॉम होम निमित्तानं इंटरनेटचा वेगात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नेटवर्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी हाय-स्पीड इंटरनेटला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. इंटरनेटचा वापर व्यवसायात सुलभतेने कसा प्रभावीपणे करता येतो हे या निमित्तानं समोर आलं आहे.
Coronavirus : कोरोनाच्या संकटामुळे झाले पाच मोठे बदल; काय धडा घेणार जग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 10:48 IST