शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चीनमध्ये ५ कोटी लोकांनी लुटला पर्यटनाचा आनंद; पाच दिवसांची सार्वजनिक सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:22 IST

सरकारला एकाच दिवशी मिळाला १.३८ अब्ज डॉलरचा महसूल

बिजिंग : कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या व या साथीचे अद्याप पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या चीनमध्ये १ मे रोजी, कामगार दिनापासून सलग पाच दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर झाली आहे. त्याच्या पहिल्या दोन दिवसांत, सुमारे पाच कोटी लोकांनी देशातच विविध पर्यटनस्थळी जाऊन सहलीचा आनंद लुटला. ही सुटी उद्या मंगळवारी संपणार असून तोवर हा आकडा नऊ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

चीनमध्ये या सुट्या सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, १ मे रोजी देशभरात सुमारे २ कोटी ३० लाख लोक विविध ठिकाणी सहलीला गेले होते. त्यातून सरकारला १.३८ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळाले. ‘कोविड-१९’मुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये हाहाकार माजलेला असताना, चीनमध्ये मात्र परिस्थिती टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या हुबेई प्रांतापासून ते अन्य ठिकाणी या साथीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे.

चीनमधील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशामध्ये २ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. त्यामध्ये विदेशवारीहून परतलेल्या एका नागरिकाचा समावेश आहे. चीनमध्ये रुणांची एकूण संख्या ८२ हजारांवर पोहोचली असून, साडेचार हजारपेक्षा जास्त रुग्ण मरण पावले आहेत.अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पहिले पाऊलदेशातील विविध ठिकाणी सहलीला जाऊ इच्छिणाºया पर्यटकांपैकी फक्त ३० टक्केच पर्यटकांना सरकारने परवानगी दिली आहे. चीनमधील सर्व पर्यटस्थळे पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र गेल्या शुक्रवारपासून दिसत आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे हे उचललेले पहिले पाऊल आहे. या प्रयत्नांत नक्की यश येईल, असा विश्वास सत्ताधारी असलेल्या कम्युनिस्ट पार्टीने व्यक्त केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटनchinaचीन