वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधावारी दुपारी 2,19,033 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 82909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे.
युरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त कोरोनाचा कहर इटलीमध्ये झाला आहे. इटलीमध्ये कालच्या दिवसभरात 475 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोणत्याही देशाती आकडेवारीपेक्षा जास्त आहे. यामुळे इटलीमध्ये वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या 10000 विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविण्यात आले आहे. त्यांची अंतिम परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
तर इराणमधून दिलासादायक बातमी आली आहे. 103 वर्षांची वृद्ध महिला कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरी झाली आहे. स्थानिक मीडियानुसार तिची ओळख पटलेली नाही. सेमनान शहरातील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. ही महिला कोरोना व्हाय़रसपासून बरी झालेली इराण दुसरी सर्वांत वृद्ध महिला आहे. याआधी केर्मान शहरामधील 91 वर्षांच्या वृद्धेने कोरोनावर मात केली होती.
श्रीलंकेमध्ये बुधावारी सकाळपर्यंत 44 रुग्ण सापडले आहेत.