शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दोन विश्वयुद्ध पाहणाऱ्या १०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; ठणठणीत होऊन परतल्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 11:13 IST

तीन आठवडे जीवन आणि मृत्यूशी आजींनी संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे.

लंडनः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. अमेरिका, ब्रिटनसह इटली, स्पेनसारखे देश या महारोगराईच्या कचाट्यात सापडले आहेत. सध्या ब्रिटनमध्ये १०६ वर्षांच्या आजीबाई चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कोरोना व्हायरसवर मात केली असून, त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. टेलिग्राफ डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये कोरोनाचा पराभव करणाऱ्या आजी त्या देशातील सर्वाधिक वयस्कर महिला आहेत. तीन आठवडे जीवन आणि मृत्यूशी आजींनी संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधल्या या आजीबाईंनी दोन विश्वयुद्धसुद्धा पाहिली आहेत. कॉनी टिचेन नावाच्या वृद्ध आजी बर्मिंगहॅमध्ये राहतात. टिचेन यांचा जन्म 1913मध्ये झाला होता. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा भयानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं. अखेर त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात राहून कोरोना विषाणूचा पराभव केला. या आठवड्यात कॉनी टिचेन यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी कॉनी टिचेन यांना टाळ्यांचा कडकडाटासही अलविदा केले.टिचेन म्हणाल्या, की मी खूप भाग्यवान आहे, मी कोरोनासारख्या विषाणूचा पराभव केला आहे. आता मला माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. त्यांची देखभाल करणारी नर्स स्मिथ म्हणाली, कॉनीची तब्येत बरी झाली असली तरी हे आश्चर्यचकित करणारं आहे. टिचेनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की 100 वर्षे वयाची पार केल्यानंतरही त्या खूप सक्रिय राहतात. त्यांना नाचणे आणि गोल्फ खेळणे खूप आवडते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर 30 दिवसांतच त्या पुन्हा धावू लागल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या