शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा विषाणू किमान १० वर्ष तरी जाणार नाही; BioNTech ची माहिती

By मोरेश्वर येरम | Updated: December 26, 2020 15:57 IST

कोरोना व्हायरस संदर्भातील एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना कोरोनाच्या डेडलाइनबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.

लंडनकोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता युरोपात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा हा प्रकोप लक्षात घेता पुढील किमान १० वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील, असं महत्वपूर्ण विधान BioNTech चे सीईओ उगुर साहिन यांनी केलं आहे. 

कोरोना व्हायरस संदर्भातील एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना कोरोनाच्या डेडलाइनबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. "आपल्याला 'न्यू नॉर्मल'ची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे. पुढील १० वर्षतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहणार आहे", असं साहिन म्हणाले. 

BioNTech ची कोरोनावरील लस अमेरिकेच्या दिग्गज फायझर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विकसीत करण्यात आली आहे. या लशीला सध्या ४५ हून अधिक देशांमध्ये सार्वजनिक वापरासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांचाही यात समावेश आहे. 

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही येत्या ६ आठवड्यांमध्ये लस तयार होऊ शकते, असंही साहिन यांनी सांगितलं आहे. "मेसेंजर टेक्नोलॉजीची सर्वात सुंदर गोष्टी अशी आहे की यामाध्यमातून आपल्याला थेट लशीवर काम करता येतं. यातून लशीची कॉपी तयार करणं सहज शक्य होतं. त्यामुळे फक्त ६ आठवड्यांमध्ये आपण नवी लस तयार करू शकतो", असं साहिन म्हणाले. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझरची लस परिणामकारक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

ब्रिटनमध्ये जेव्हापासून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची उत्पत्ती झाली आहे. तेव्हापासून आठवड्यातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद ब्रिटनमध्ये होत आहे. त्यामुळे भारत, अमेरिकासहीत इतर सर्व देशांना घाम फुटला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडनUSअमेरिका