शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच गुप्तचर संस्थेने केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:11 IST

Corona : अमेरिकेत डोनाल्ड ट्र्म्प सत्तेवर येताच अमेरिकेतील गुप्तचर संस्थेने कोरोना संदर्भात मोठा दावा केला आहे.

Corona ( Marathi News ) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. दुसऱ्या दिवशीपासूनच ट्रम्प अॅक्शनमोडवर आले आहेत. पहिल्या ट्रम्प यांनी पहिला कार्यकाळ गाजवला आहे, यामुळे आता जगभरात त्यांची चर्चा सुरू आहे.  ट्रम्प सत्तेवर येताच सीआयएने कोरोना बाबत मोठा दावा केला आहे. 

Donald Trump : अमेरिकेने १० वर्षात २० लाख लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला; जाणून घ्या किती भारतीयांना धोका

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या  कार्यकाळातही कोरोनाव्हायरसला ट्रम्प यांनी'चिनी विषाणू' असे संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते. अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे. चीनने अमेरिकेच्या अहवालाचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

एजन्सीने पुरावे सादर केले नाहीत

सीआयएने दाव्यात म्हटले आहे की, कोविड विषाणू निसर्गातून नव्हे तर प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. एजन्सीने या दाव्यांवर कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून शनिवारी ते सार्वजनिक करण्यात आले.

कोरोनाव्हायरस प्रयोगशाळेतून उद्भवण्याची शक्यता नैसर्गिक नाही, तर तो जाणीवपूर्वक प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, असा दावा सीआयएने केला आहे. कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याने या प्रश्नांची उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत, असा दावाही गुप्तचर विभागाने केला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार अमेरिकेत सर्वाधिक झाला. अमेरिकेत लाखो लोकांनी प्राण गमावले. ट्रम्प यांनी त्यांच्या गेल्या कार्यकाळात कोरोना विषाणूबाबत चीनवर जोरदार निशाणा साधला होता. सार्वजनिकरित्या, त्यांनी अनेक वेळा कोरोनाव्हायरसचा उल्लेख 'चिनी विषाणू' असा केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका