शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: भयंकर! अमेरिकन संशोधकांनी तयार केला कोरोनाचा घातक स्ट्रेन, संसर्ग झाल्यास मृत्यू अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 19:17 IST

Corona Virus: अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा एक अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केला आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा एक अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केला आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या लॅबमधील अशाच एका कथित प्रयोगामुळे कोरोनाची साथ जगभर पसरली होती.

फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका समुहाने विद्यापीठामधील लॅबमध्ये हे संशोधन केले आहे, दरम्यान, या संशोधनाच्या बातम्या समोर येताच तज्ज्ञांनी संशोधकांच्या या प्रयोगावर टीका केली आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या उंदरांपैकी ८० टक्के उंदरांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रयोग म्हणजे आगीशी खेळण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

विद्यापीठाने सांगितले की, कोरोनाचा हा स्ट्रेन ओमायक्रॉन आणि वुहानमधील मूळ विषाणूचं मिश्रण आहे. संशोधकांनी ओमायक्रॉनमधून स्पाइक प्रोटिन काढले आणि ते चीनमधील वुहान येथून कोरोनाच्या संसर्गास सुरू झाली, त्या स्ट्रेनमध्ये मिसळले. त्यानंतर त्यांनी बाधित उंदरांनी हायब्रिड स्ट्रेनवर कशी प्रतिक्रिया दिली, याचं चित्रण केलं. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या स्ट्रेनमध्ये ओमायक्रॉनच्या तुलनेच पाच पट अधिक संक्रामक क्षमता आहे.

हा प्रयोग फ्लोरिडा आणि बोस्टनमधील संशोधकांच्या एका टीने नॅशनल एमर्जिंग इंफेक्शियस डिजीज लेबॉरेटरीमध्ये केला. ही प्रयोगशाळा अमेरिकेतील जैविक हल्ल्यापासून खबरदारी घेणाऱ्या लॅबपैकी एक आहे. येथे कोरोना आणि इबोलासारख्या जीवघेण्या आजारांवर संसोधन सुरू आहे.  दरम्यान, इस्राइल सरकारचे प्रमुख शास्त्रज्ञ शमूएल शापिरा यांनी या प्रयोगावर पूर्णपणे निर्बंध घातले गेले पाहिजेत असे सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाOmicron Variantओमायक्रॉनHealthआरोग्य