शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Omicron Variant : रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 19:15 IST

Corona Virus Omicron Variant : डब्ल्यूएचओने म्हटले आहे, "ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. पण..."

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिअंटसंदर्भात इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. मात्र, यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशा परिस्थितीत रुग्णालयांनी विशेष तयारी करणे गरजेचे आहे. चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉनची लागण झालेल्या एका व्यक्तीचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे आणि मृत्यूची ही जगातील पहिलीच घटना आहे. 

रुग्णालयाती रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता -डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटले आहे, की जागतिक स्तरावर व्हेरिअंट ऑफ कंसर्नशी संबंधित रुग्णसंखेत वाढ झाल्याने, हॉस्पिटलायझेशन आणि मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे. याच वेळी, या नव्या व्हेरिअंटने संक्रमित झालेल्या लोकांच्या स्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणखी माहितीची आवश्यकता आहे. यामुळे देशांनी रुग्णालयात दाखल रुग्णांशी संबंधित माहिती शेअर करावी, असेही WHO ने म्हटले आहे. सध्या हा नवा व्हेरिअंट 60 हून अधिक देशांत पसरला आहे.

ओमायक्रॉनवर इंग्लंडनं दिला इशारा - ओमायक्रॉनसंदर्भात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, 'ओमाक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद गोष्ट म्हणजे. यामुळे हा व्हायरसचा किरकोळ प्रकार आहे, ही कल्पना आपण बाजूला ठेवायला हवी. लोकांमध्ये पसरण्याचा वेग आपण लक्षात घ्यायला हवा.

आरोग्य सचिव साजिद जाविद यांनीही या व्हेरिअंटसंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'लंडनमध्ये 44% लोकांना या व्हेरिअंटची लागण झाली आहे आणि 48 तासांत तो राजधानीत पूर्णपणे पसरेल'. एवढेच नाही, तर रोज ओमायक्रॉनचे सुमारे 200,000 नवे रुग्ण समोर येऊ शकतात, असा अंदाजही जाविद यांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना