शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : भयावह! कोरोनाग्रस्त वडिलांना घेऊन लेकीची धावपळ; 'कोणी मेलं तरच मिळेल बेड' असं मिळतंय उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:06 IST

China Corona Virus : चीनमधील एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत. एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहे. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनमधील एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीच्या वडिलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोना झाला होता. पण त्यांना अजूनही बेड मिळालेला नाही. तिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "माझे वडील खूप आजारी होते. त्यांना घेऊन आम्ही तीन रुग्णालयात गेलो. पण बेड मिळाला नाही. त्यांच्यावर उपचारही झाले नाहीत. डॉक्टर म्हणाले, तुझे वडील खूप आजारी आहेत. पण आमच्याकडे बेड रिकामे नाहीत."

"आज दहा लोक मेल्यानंतर दहा बेड खाली झाले. आता या ठिकाणी एकही बेड नाही. कोणी तरी मेल्यावरच सर्वात आधी ज्या रुग्णांनी बेडसाठी नंबर लावला आहे, त्यांना बेड मिळेल. त्यानंतर तुझ्या वडिलांना बेड मिळेल" असं डॉक्टर सांगत असल्याचं ही तरुणी व्हिडीओमध्ये म्हणाली. चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यांत म्हणजेच ९० दिवसांत चीनची ६० टक्के आणि जगभरातील १० टक्के लोकसंख्या कोरोनाने संक्रमित होऊ शकते.

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट; रुग्णालयात मृतदेहांचे ढीग, ८० कोटी लोकांना धोका

ही केवळ सुरुवात असून कोरोनाच्या संक्रमणामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर, ८० कोटी लोक कोरोनाबाधित होऊ शकतात असंही म्हटलं आहे. विषाणू तज्ज्ञ एरिक फेइगल यांच्या मते, चीनची राजधानी बीजिंगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. शवागृह भरली आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची गरज असते. २००० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ते म्हणाले की, २०२० ची परिस्थिती पुन्हा येत असल्याचे दिसते, परंतु यावेळी ते युरोपसह पाश्चात्य देशांमध्ये नाही तर चीनमध्ये घडत आहे. चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या