शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Omicron Alert : सावधान...! भारतात कोरोना स्‍फोट होणार, ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 22:44 IST

कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित करणारे केंब्रिज विद्यापीठाचे जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टूमन यांनी त्यांच्या ईमेलमध्ये ही भीती व्यक्त केली आहे.

नवी दिल्‍ली - भारतात येत्या काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढीचा दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हा कोरोना स्फोट काही काळासाठीच असेल. पण तो खूप वेगाने पसरू शकतो. अत्यंत वेगाने संक्रमित होणारा ओमायक्रॉन भारतासाठी चिंतेचे कारण बनू शकतो. कारण येथील लोकसंख्या सुमारे 140 कोटी एवढी आहे. कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित करणारे केंब्रिज विद्यापीठाचे जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टूमन यांनी त्यांच्या ईमेलमध्ये ही भीती व्यक्त केली आहे.

पॉल कट्टूमन म्हणाले, भारतात कोरोनाचा स्फोट थोड्या काळासाठी असू शकतो. पण या काळात दैनंदिन प्रकरणांमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होईल. याशिवाय, प्रोफेसर पॉल कट्टूमन आणि त्यांच्या टीमने म्हटले आहे, की या आठवड्यापासून नवीन संसर्गाची प्रकरणे वाढू लागतील. मात्र, रोज किती रुग्ण समोर येऊ शकतात हे सांगणे कठीण आहे. तसेच, प्रोफेसर पॉल आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या कोविड-19 इंडिया ट्रॅकरने देशातील सहा राज्यांसाठी विशेष चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता - यात सांगण्यात आले आहे, की 24 डिसेंबरपर्यंत नव्या रुग्ण संख्येत 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, तर 26 डिसेंबरपर्यंत भारतातील 11 राज्यांमध्ये संसर्ग पसरू शकतो. यानंतर कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू शकते. विशेष म्हणजे, भारतात आतापर्यंत 480290 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून लाखो लोकांना याची लागण झाली आहे. 

देशात, अनेक राज्यांतील लोकांनाही कोरोना विषाणूच्या नव्या  ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झाली आहे. सध्या देशात 653 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र हा व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याने देशात सावधगिरी बाळगली जात आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंड