शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 08:55 IST

corona Third wave: मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. डब्ल्यूएचओने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आकडा आणखी वाढू  शकतो, कारण व्हायरसच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत.

संयुक्त राष्ट्र : जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा (Delta variant) कहर वाढू लागला आहे. हा व्हायरस वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने हा व्हेरिअंट ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. तसेच येत्या महिन्यांत कोरोनाचे (corona virus) हे नवे स्वरूप जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा व्हेरिअंट पहिल्यांदा भारतात सापडला होता. मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. (corona virus Delta variant spread in 96 countries: WHO)

डब्ल्यूएचओने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आकडा आणखी वाढू  शकतो, कारण व्हायरसच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. अनेक देशांनी डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोना संक्रमण वाढत असल्याचे कळविले आहे. या व्हेरिअंटचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये वाढू लागले आहेत. यामुळे पुढील काही काळात डेल्टा व्हेरिअंट जगामध्ये थैमान घालण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (WHO warns of third coronavirus wave in Europe)

डब्ल्यूएचओने गेल्याच आठवड्यात म्हटले होते की, आतापर्यंत जेवढे कोरोनाचे व्हेरिअंट सापडलेत त्यात डेल्टा हा सर्वाधिक संक्रमक आहे. हा व्हेरिअंट कोरोना लस न घेतलेल्या लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. काही देशांनी निर्बंध शिथिल केले आहेत, यामुळे जगात कोरोनाचा वेग वाढत आहे. अल्फा व्हेरिअंट १७२ देशांमध्ये, बीटा व्हेरिअंट १२० देशांमध्ये आणि गॅमा व्हेरिअंट ७२ देशांमध्ये पसरला आहे. 

युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारावृत्तसंस्था रॉयटरनुसार डब्ल्यूएचओने युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे युरोपविभागाचे प्रमुख हंस क्लुगे यांनी सांगितले की, गेल्या दहा आठवड्यांपासून युरोपमध्ये सुरु असलेला कोरोना रुग्णांचा घसरता आकडा आता संपणार आहे. जर लोकांनी नियंत्रण ठेवले नाही, काळजी घेतली नाही तर आणखी एक लाट टाळता येणार नाही, असे ते म्हणाले आहेत. डब्ल्यूएचओचे महानिदेशक टेड्रोस यांनी गुरुवारी सांगितले की, प्रत्येक देशाने सप्टेंबरपर्य़ंत किमान १० टक्के लोकांचे लसीकरण करावे. जोवर प्रत्येक देशातून कोरोना संपत नाही तोवर आपण ही महामारी संपवू शकणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना