शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत 2400 लोकांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 10:45 IST

ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार जूनमध्ये अमेरिकेत दररोज २ लाख नव्या रुग्णांची नोंद होऊन सुमारे ३ हजार जण मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत देशात २४०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 75 हजारांपेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.अमेरिकेत कोरोनाने अक्षरक्षः थैमान घातले आहे. नवीन रुग्णांची आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ९ हजारांच्या पुढे पोहोचला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. 

देशात एकाच दिवशी सर्वाधिक ६०० बाधितांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहा दिवसांपूर्वी ४७४ जणांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण बाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७७३ एवढी झाली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाखांहून जास्त असल्याची नोंद अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील विज्ञान व अभियांत्रिकी केंद्रानं केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगात २ लाख ५७ हजारपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी असल्याचे जाहीर केले होते. 

अमेरिकेतील कोरोनाचे संकट येत्या जून महिन्यात आणखी गंभीर संकट धारण करू शकते. ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार जूनमध्ये अमेरिकेत दररोज २ लाख नव्या रुग्णांची नोंद होऊन सुमारे ३ हजार जण मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या सात आठवड्यांपासून सर्व राज्यांचा कारभार ठप्प आहे. त्याचा दुष्परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

अमेरिकेत आता कोरोना विषाणूची एकूण संख्या 12 लाख 50 हजारांवर गेली आहे. विशेष म्हणजे जगभरात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 4 दशलक्ष इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या