शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Corona Virus: चीननंतर इटलीत कोरोनाची दहशत; एका दिवसात तब्बल ३६८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 11:41 IST

Corona Virus: इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

ठळक मुद्देरविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहेमहायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले होतेकोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. चीनपाठोपाठइटलीमध्येकोरोना व्हायरसमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. आशियातील चीन हा कोरोनाचा केंद्रबिंदू होता तर युरोपातील इटलीवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे.

इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. एका दिवसात इटली कोरोनामुळे इतके लोक मृत्यू झाले जेवढे दुसऱ्या महायुद्धातही एका दिवसात झाले नाहीत. रविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा आकडा सगळ्यात मोठा आहे. याच्या एक दिवसाअगोदरच इटलीत २५० जणांचा जीव गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आकडा इटलीत किती भयंकर आहे याची कल्पना देते. 

जर दुसऱ्या महायुद्धात एका दिवसात झालेल्या मृत्यूची तुलना केल्यास कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. महायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले. तर कोरोनामुळे एका दिवसात २५० आणि ३६८ हा आकडा गाठला. ६ वर्ष सुरु असलेल्या महायुद्धाची तुलना कोरोना व्हायरसची होऊ शकत नाही. मात्र सरासरी मृत्यूंचा आकडा पाहायला गेला तर कोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे. 

कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. यातील ६५०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनमध्ये ३२०० तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ११२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराचा धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे असं रोहित दत्ता यांनी सांगितले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोनाItalyइटलीchinaचीनIndiaभारत