शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: अ‍ॅमेझॉन करणार १ लाख कर्मचाऱ्यांची भरती; कारण ठरतोय कोरोना व्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 11:46 IST

Corona Virus: मात्र बाजारपेठा बंद असल्याने लोकांना घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ऑनलाइन विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ठळक मुद्देफुलटाइम आणि पार्टटाइम नोकरीची संधी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद असल्याने लोकांना ऑनलाइन शॉपिंगचा पर्यायगरजेच्या वस्तू अ‍ॅमेझॉन घरपोच पोहचवणार

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरातील अन्य देशांमध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. चीनमध्ये वुहान शहरातील नागरिकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व नागरिकांना घरात बंदिस्त करण्यात आलं होतं. अशीच परिस्थिती अन्य देशांमध्ये सुरु आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे.

मात्र बाजारपेठा बंद असल्याने लोकांना घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ऑनलाइन विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याच पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉनने अमेरिकेत १ लाख नवीन कामगारांची भरती सुरु केली आहे. यात फुलटाइम आणि पार्टटाइम नोकरीची संधी देण्यात आली आहे. गोदाऊनपासून ते लोकांच्या घरापर्यंत माल घेऊन जाण्याचं काम या कर्मचाऱ्यांना करावं लागणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात ७ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. त्यामुळे या लोकांचा कल ऑनलाइन शॉपिंगकडे वळाला आहे. आवश्यक लागणाऱ्या वस्तू ऑनलाइन मागवण्यात येत आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉनला कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. सध्या कंपनीकडे ७ लाख ९८ हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांना आणखी १ लाख कर्मचाऱ्यांची गरज आहे. नवीन कर्मचाऱ्यांना तासाला कमीत कमी २ डॉलर ते १५ डॉलर पगार देण्यात येणार आहे.

मात्र सरकारच्या नियमांनुसार कंपनीला व्यवसाय सुरु ठेवता येणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. मात्र घरातल्या लोकांना गरजेच्या वस्तू खाद्य, मेडिकल आणि अन्य सामुग्री इ. लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून याचा विचार होऊ शकतो असं अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे चीन, इटलीपाठोपाठ स्पेननेही देशभरातील नागरिकांना सर्व कामकाज शनिवारी बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. कार्यालयात जाण्यासाठी, वैद्यकीय कारण किंवा अन्नधान्य खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली होती. त्या देशात कोरोनामुळे १५ दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तर भारतातही अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिलेत. तसेच शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन केले आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनonlineऑनलाइनShoppingखरेदीcorona virusकोरोना