शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Coronavirus : कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:38 IST

Coronavirus News : मुंबईत सोमवारी एक तर पुण्यात दोन संशयीत रुग्ण आढळले.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्गामुळे आतापर्यंत ८९ जण मरण पावले असून, तीन हजार जणांना त्याची लागण झाली आहे. मंगोलियाने चीनला लागून असलेल्या सर्व सीमा बंद केल्या असून, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, मकाऊ, तैवान, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, मलेशिया, फ्रान्स, कॅनडा, व्हिएटनाम व नेपाळ या १२ देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.चीनच्या सीमा अरुणाचल व भूतानकडून भारताला जोडल्या गेल्या आहेत. नेपाळमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात चीन व नेपाळसह वरील सर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. काही जण चीनहून अन्य देशांच्या मार्गे परतत असल्याने त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यात येत आहे.मुंबईत सोमवारी एक तर पुण्यात दोन संशयीत रुग्ण आढळले. याखेरीज आधीच्या संशयीत रुग्णाला पुन्हा देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आधीच्या तीन संशशियांपैकी कोणालाही लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र केरळमध्ये एक व राजस्थानमध्ये दोन संशयीत आढळले असल्याचे समजते.चीनमधील वुहान प्रांतात सुमारे ७00 भारतीय होते. त्यात नोकरी करणारे तसेच विद्यार्थी होते. त्यापैकी अनेक जण आधीच परतले असले तरी सुमारे २५0 जण अद्याप वुहानमध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारताच्या चीनमधील दुतावास त्यांच्या संपर्कात आहेत.जे भारतीय तिथे नोकरी करतात, पण ज्यांचे पासपोर्ट कार्यालयांकडे जमा आहेत, त्यांनाही पासपोर्ट शिवाय देशात आणण्याची व्यवस्था भारतातर्फे केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)भारतीयांना आणण्यास विमान तयारएअर इंडियाने एक विमान चीनमधून परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी राखून ठेवले आहे. गरजेनुसार ते पाठवण्यात येणार आहे. चीनमधील १७ शहरे बंद करण्यात आली आहे आणि तिथे सर्वत्र सुटी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना बाहेर पडण्यास बंदी असून, त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहे. या शहरांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.

टॅग्स :corona virusकोरोना