CoronaVirus News: कोरोना लस ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक; मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 01:56 AM2020-11-10T01:56:26+5:302020-11-10T07:00:31+5:30

जर या लसीला औषध नियंत्रकांनी मान्यता दिली तर यंदा वर्षअखेरीस ती वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.

Corona vaccine is more than 90 percent effective | CoronaVirus News: कोरोना लस ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक; मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा

CoronaVirus News: कोरोना लस ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक; मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा

Next

वॉशिंग्टन : फायझर व बायऑनटेक या औषध कंपन्या संयुक्तपणे विकसित करत असलेली बीएनटी१६२बी२ ही कोरोना प्रतिबंधक लस ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे प्रयोगांतून आढळून आले आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असून त्याचे हे निष्कर्ष आहेत. हे संशोधन म्हणजे मानवतेच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे असा दावा फायझर कंपनीचे अध्यक्ष व सीइओ डॉ. अल्बर्ट बौर्ला यांनी केला आहे.

जर या लसीला औषध नियंत्रकांनी मान्यता दिली तर यंदा वर्षअखेरीस ती वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. फायझर ही अमेरिकी व बायऑनटेक ही जर्मन कंपनी आहे. जगभरात काही कोरोना प्रतिबंधक लसींच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यापैकी फायझर व बायऑनटेकने सर्वप्रथम आपल्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यांतील प्रयोगांचे प्रारंभीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. यंदाच्या वर्षी या कोरोना लसीचे ५ कोटी डोस तसेच पुढील वर्षी १.३ अब्ज डोस बनविण्याची आमची तयारी असल्याचे फायझर व बायऑनटेकने एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Corona vaccine is more than 90 percent effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.