शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 21:05 IST

'अशा' असहाय लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. हे लोक इतरांच्या नावाने नोंदणी करून कोरोनाची लस घेत आहेत.

जगात पैसा मिळविण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाताना दिसतात. अनेकवेळा लोक पैशाच्या लालसेपोटी जीवाचीही परवा करत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. सध्या जगभरात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. अशात अनेक संस्थांनी लोकांना कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता लोकांवर बळजबरीने लस घेण्याची वेळ आली आहे. कारण अनेक लोकांना अजूनही कोरोना लस घातक आहे असे वाटते. यामुळे ते लस घेण्यास कचरतात. मात्र, आता ती सक्तीची झाल्याने लोकांवर मजबुरीने लस घेण्याची वेळ आली आहे.

अशा 'असहाय' लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. हे लोक इतरांच्या नावाने नोंदणी करून कोरोनाची लस घेत आहेत. यासाठी ते संबंधित व्यक्तीकडून चार हजार रुपये घेत आहेत आणि त्या व्यक्तीला लस घेऊन लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवून देत आहेत. अशीच एक व्यक्ती इंडोनेशियात समोर आली आहे. ही व्यक्ती इतरांच्या नावाने लस घेऊन केवळ 4 हजार रुपयांत त्या वक्यक्तीला प्रमाणपत्र विकत असे.

माध्यमांतील वृत्तानुसार, इंडोनेशियातील या व्यक्तीचे नाव अब्दुल रहीम असे आहे. तो इंडोनेशियातील साउथ सुलावेसी येथील रहिवासी आहे. या व्यक्तीने आतापर्यंत एकूण 14 कोरोना लसी घेतल्या आहेत. यांपैकी 2 डोस त्याने स्वतःच्या नावाने घेतले आहेत, तर उर्वरित इतरांच्या नावावर घेतले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर हा व्यक्ती इतरांच्या नावाने लस घेत असे व नंतर त्याचे प्रमाणपत्र पाचशे ते चार हजारांना विकत असे.

उघडपणे तयार केला व्हिडिओ - रहिमने यासंदर्भात व्हिडिओ बनवून लोकांना ऑफर दिल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्याने उघडपणे व्हिडिओ तयार करत म्हटले आहे, की जर कुणाला इंजेक्शनशिवाय कोरोना प्रमाणपत्र हवे असेल, तर त्याच्याशी संपर्क साधावा. बघता बघता रहीमचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. आता हे प्रकरण स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचले असून देशाच्या संसर्गजन्य रोग कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे कृत्य करणारा रहिम एकटाच व्यक्ती नसल्याचेही समोर आले आहे. असे कारनामे करून प्रमाणपत्रे विकणारे अनेक जण इंडोनेशियामध्ये आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndonesiaइंडोनेशियाcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन