शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

३ अब्ज डोस पुरविल्यावर कोरोनाची लस घेतली माघारी; दुर्मीळ दुष्परिणामांच्या कबुलीनंतर ॲस्ट्राझेनेकाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:48 IST

ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या व प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याचे उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने न्यायालयात कबुल केले. त्यानंतर कंपनीने जगभरातून ही लस परत मागविण्यास सुरुवात केली. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लशींची संख्या अधिक असल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले. लशीमुळे दुर्मीळ स्वरूपात दुष्परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर कंपनीनेही ते मान्य केले. त्यानंतर कंपनीने स्वतःहून ही लस मागे घेण्याची घोषणा केली. तसेच युरोपीयन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी याबाबत नोटीस जारी केली.

६५ लाखांहून अधिक जीव वाचविलेकोविड-१९ लसीचे अत्यंत दुर्मीळ दुष्परिणाम असू शकते. ‘व्हॅक्सवेरिया’ने जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यात जी भूमिका बजावली त्याचा आम्हाला कमालीचा अभिमान आहे, असे कंपनीने म्हटले. लस सादर झाल्यानंतर पहिल्या वर्षात ६५ लाखांहून अधिक लोकांचे जीव वाचले आणि जगभरात तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. भारतात २२० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आणि त्यापैकी बहुतांश कोव्हिशिल्ड होत्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या