शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : चीनमध्ये १३ शहरांत प्रवासावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 05:34 IST

चीनमध्ये कोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे, तर या विषाणूूंंचा ८८० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.चीनच्या हुबेई प्रांताच्या जिंगझोऊमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू आढळला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातून जाणाºया सर्व रेल्वे सेवा आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी ४ वाजता बंद राहील, तर सार्वजनिक बस, पर्यटन बस फेºया व अन्य नौका सेवा अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत.हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.७00 भारतीय विद्यार्थी चीनमध्येचीनमधील विषाणूंच्या प्रसाराने भारताची काळजीही वाढली आहे. कारण, जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात. बहुतांश विद्यार्थी चीनच्या विद्यापीठात शिकत आहेत.चीनमध्ये कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार दहा दिवसांच्या आत नवे हॉस्पिटल उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हे हॉस्पिटल २५ हजार स्क्वेअर मीटरमध्ये आणि १००० बेडचे असणार आहे.या विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ८९ वर्षांची आहे. तर सर्वात कमी वयाची व्यक्ती ४८ वर्षांची आहे.भारतीय दूतावासाने कार्यक्रम केला रद्दचीनमध्ये पसरलेल्या कोराना विषाणूंमुळे बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.दूतावासाने टष्ट्वीट केले आहे की, भारतीय दूतावासाने २६ जानेवारीला आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत