शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती बोलसोनारो यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह, ओमर अब्दुल्ला म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 21:24 IST

जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोना महामारीमुळे अमेरिका आणि ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेतील संक्रमितांची एकूण संख्या आता 28 लाख 39 हजारच्याही पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 29 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दुसरीकडे, ब्राझीलमध्ये एका दिवसात तब्बल 38 हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच काळात येथे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता, ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. 

ब्राझिलमधील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 15 लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. तर 64 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बोलसोनारो हे फुफ्फुसांचा एक्स रे काढायला गेल्यानंतर त्यांच्या कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. यापूर्वीही बोलसोनारो यांनी स्वत:ला अस्वस्थ वाटत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, माझी प्रकृती उत्तम असल्याचं बोलसोनारो यांनी सीएनएन ब्राझीलशी बोलताना सांगितले. तसेच, मी तज्ञांचा सल्ला घेत असून उपचार सुरु आहेत. त्यासोबतच, हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, अँटी मलेरिया औषधांचा डोस घेत असल्याचेही त्यांनी म्हटले.  

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करुन यासंदर्भात मत मांडलं आहे. कोरोना व्हायरसच ही बातमी स्वत: लिहिण्याची वाट बघत होता, असे म्हणत अब्दुल्ला यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. दरम्यान, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात बोलसोनारो यांची कोविड 19 ची चाचणी सार्वजनिक केली होती. त्यावेळी, करण्यात आलेल्या तिन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या. अमेरिकेतील फ्लोरिडा येथ अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलसोनारो यांनी मार्च महिन्यात या चाचण्या केल्या होत्या. 

जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझिलमध्येच झाले आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 12 लाख 39 हजार 378 एवढी होती. तर यापैकी तब्बल 5 लाख 30 हजार 110 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 60 लाख 44 हजार 414 लोक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmar Abdullahउमर अब्दुल्लाBrazilब्राझील