शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:55 IST

कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत एक लाख हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.

ठळक मुद्देस्पेनमधील मृतांची संख्या 10,003 वर जगभरात कोरोनामुळे 46,906 जणांचा मृत्यू जगभरात 9,35,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

माद्रिद  : कोरोनामुळे संपूर्ण युरोपात हाहकार माजला आहे. संपूर्ण जगाचा विचार करता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी अर्धे लोक एकट्या युरोपातील आहेत. जगातील कोरोना बाधितांची संख्या लवकरच 10 लांखांवर जाऊन पोहोचणार आहे. मात्र यापैकी एकट्या युरोपातच पाच लाख लोक कोरोनाने त्रस्त आहेत. तेथे मरणारांचा आकडा तब्बल 35 हजारवर जाऊन पोहोचला आहे. 

कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत एक लाख हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.

स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत सर्वाधिक 950 जणांचा कोरोनाने जीव घेतला. आता तेथील मृतांची संख्या 10,003 वर पोहोचली आहे. येथे आतापर्यंत तब्बल 110,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्पेनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संक्रमाणाचा दर आता 8.3 टक्क्यांहून 7.9 टक्क्क्यांवर आला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हे प्रमाण 25 टक्के होते. स्पेनमध्ये सर्वाधिक फटका राजधानी माद्रिदला बसला आहे. येथे तब्बल चाह हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 32 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 जगभरात कोरोनामुळे 46,906 जणांचा मृत्यू -जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 46,906 वर पोहोचला आहे. जगभरात 9,35,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणीची तयारी -ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी एका व्हिडिओच्या मदतीने म्हटले आहे, की आम्ही देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्याची तयारी केली आहे. अशा पद्धतीने आम्ही त्याला हारवू. जॉनसन सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. ब्रिटेनमध्ये आतापर्यंत 33 हजारहून अधिक कोरोनाबाधीत सापडले आहेत. तर तीन हजारवर लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

आशियात चीननंतरइंडोनेशियात सर्वाधिक लोकांचा मृत्यू -आशिया खंडात चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो इंडोनेशियाला. कोरोनामुळे  चीननंतर येथेच सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येते आतापर्यंत 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3,300 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 1800 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू आणि संसर्ग झालेले देश - देश           -       मृत्यू       -       संक्रमितइटली         -    13,155      -      1,10,574स्पेन           -    10,003    -      1,10,238अमेरिका    -    5,113        -      2,15,362फ्रांस          -    4,032       -       56,989चीन           -     3,318       -        81,589ईरान         -     3,160       -       50,468ब्रिटेन        -     2921         -       33,718

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीEnglandइंग्लंडFranceफ्रान्सAmericaअमेरिकाIranइराणchinaचीनIndonesiaइंडोनेशिया