शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जगात अंटार्क्टिकावरच नाही कोरोना, हजार शास्त्रज्ञ वास्तव्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:39 IST

हिवाळ्याच्या मोसमात शास्त्रज्ञांची नवी तुकडी ज्यावेळी अंटार्क्टिकावर येईल त्यावेळी त्यांच्या समवेत कोरोना साथीने या प्रदेशात प्रवेश करू नये अशीच सर्वांची इच्छा आहे.

जोहान्सबर्ग : सारे जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना फक्त एका भूभागावर या संसर्गाचे अजिबात अस्तित्व आढळून येत नाही. तो प्रदेश आहे अंटार्क्टिकाचा. तिथे मास्क न वापरता तसेच कोरोनाचे दडपण न घेता मोकळेपणाने भटकता येते.सध्या अंटार्क्टिकावर सुमारे १ हजार शास्त्रज्ञ व त्यांचे मदतनीस राहत आहेत. हिवाळ्याच्या मोसमात शास्त्रज्ञांची नवी तुकडी ज्यावेळी अंटार्क्टिकावर येईल त्यावेळी त्यांच्या समवेत कोरोना साथीने या प्रदेशात प्रवेश करू नये अशीच सर्वांची इच्छा आहे. अंटार्क्टिकावर ब्रिटनचे रोथेरा रिसर्च सेंटर आहे. तेथील शास्त्रज्ञ रॉब टेलर यांनी सांगितले की, कोरोनापासून आम्ही सर्व जण या प्रदेशात सुरक्षित आहोत. कोरोना साथ येण्याच्या आधी अंटार्क्टिकावरील शास्त्रज्ञांच्या आयुष्याबद्दल सर्वांनाच काहीसे वाईट वाटत असे. कारण या प्रदेशाचा जगाशी फारसा संपर्क येत नसल्याने अंटार्क्टिकावर राहणारा माणूस काहीसा एकटा पडतो. जणू विलगीकरणात अनेक दिवस राहावे लागते तशी येथील माणसांची अवस्था असते. रॉब टेलर म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर ब्रिटनमधील नागरिकांना जितके कमी स्वातंत्र्य उपभोगायला मिळत होते, त्यापेक्षा कितीतरी मनमोकळेपणाने आम्ही अंटार्क्टिकामध्ये वावरत आहोत.आयुष्यातील रंगत ठेवली कायमन्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने अंटार्क्टिकावरील संशोधनानंतरच्या फुरसतीच्या वेळात विविध प्रकारे खेळ खेळून आयुष्यातील रंगत कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. अंटार्क्टिकावरील अतिशय थंड वातावरण हे ४० वर्षांवरील व्यक्तींच्या आरोग्यासाठी फारसे चांगले नसते, असे म्हटले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या