शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:07 PM

Covid 19 Pandemic : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर भारतानं अन्य देशांना लस पाठवण्यावर घातली होती बंदी.

ठळक मुद्दे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार माजला होता.त्यानंतर भारतानं अन्य देशांना लस पाठवण्यावर घातली होती बंदी.

"भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे," असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केलं. हे गरीब देश कोविशिल्ड (Covishield) या लसीवर अवलंबून होते. याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्यातं त्यांनी सांगितलं. 

"भारतात सर्वप्रथम कोरोनाचा B.1.617.2 व्हेरिअंट सापडला होता. करोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा होत नसल्यानं आफ्रिकी देशांवर या व्हेरिअंटचा धोका वाढला आहे. अन्य गरीब देशांनाही लसीचा पुरवठा न होण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये B.1.617.2 व्हेरिअंट तेजीनं पसरत आहे. याची ओळख पटण्यापूर्वीच हा विषाणू तेजीनं पसरतो. विषाणूच्या ११७ व्हेरिअंटमध्ये असं दिसून आलं आहे," असं स्वामिनाथन म्हणाल्या. एनडीटीव्हीशी सांधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. 

... तर अजून फटका बसेल

"जर लसींचा असाच असमान पुरवठा सुरू राहिला तर काही देशांमध्ये याचा मोठा फटका बसू शकेल. येणाऱ्या लाटा गरीब देशांसमोर मोठं संकट निर्माण करू शकतात. परंतु भारताला कोणीही सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मोठ्या प्रमाणात लस खरेदीसाठी कोणीही थाबवू शकत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनं आता १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाdoctorडॉक्टरAdar Poonawallaअदर पूनावाला