शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये निर्बंध शिथील करताच कोरोना वाढला, रुग्णालयांमध्ये गर्दी; ICU बेड्समध्ये वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 14:54 IST

चीनमध्ये कोरोना विषाणूचे संकट पुन्हा गंभीर होऊ लागले आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूचे संकट पुन्हा गंभीर होऊ लागले आहे. कोविड-19 च्या नवीन धोरणाविरोधात चीनमध्ये निदर्शने करण्यात आली, त्यानंतर बहुतांश ठिकाणी कोविड निर्बंध उठवण्यात आले. परंतु त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालय आणि अतिदक्षता विभागातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर सरकारला निर्बंध लादावे लागले. चीन सरकारच्या झिरो कोविड धोरणामुळे लोकांना घरातच राहण्यास भाग पडलं आणि आर्थिक वाढ मंदावली. याचा जोरदार निषेध नागरिकांकडून सुरू झाला. सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, साथीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांमध्ये आयसीयूची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी, चीनमध्ये कोरोनाचे १०,८१५ नवीन रुग्ण नोंदवले गेले, त्यापैकी ८,४७७ रुग्ण कोणतेही लक्षण नसलेले आहेत. 

अध्यक्ष शी जिनपिंग यांचे सरकार व्हायरसचे संक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्याच्या जनतेचा वाढता रोष पाहता सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष विलगीकरण किंवा प्रवास बंदी सारखे कठोर नियम आता लादू इच्छित नाही. 

चीनमधील अनेक रेस्टॉरंट्स बंद केलेचीनी माध्यमांनुसार, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयांना संपूर्ण मनुष्यबळ कामाला लावण्याचं आणि सुविधा वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रभावीपणे सामना करता येईल आणि औषधांचा पुरवठा वाढवता येईल यासाठीही सूचना दिल्या गेल्या आहेत. अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील ६५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. बीजिंगने गेल्या आठवड्यात अनेक भागात दिवसातून एकदा चाचणी अनिवार्य केल्यानं संसर्गाची प्रकरणं किती वाढली आहेत हे स्पष्ट नाही, परंतु मुलाखती आणि सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार देशभरातील व्यवसाय आणि शाळांमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. उद्रेक दिसून आला आहे. बरेच कर्मचारी आजारी पडल्यामुळे काही रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय बंद झाले आहेत.

रुग्णांना केलं गेलं घरीच क्वारंटाइनचीनमध्ये अधिकृत पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याची नोंद आहे, परंतु बुधवारी अनेक प्रदेशांमध्ये अनिवार्य चाचणी संपल्यानंतर लोकसंख्येचा मोठा भाग यात समाविष्य केला जात नाही असंही आढळून आलं आहे. केसेस कमी होण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे. अनेक कंपन्यांच्या बाधित कामगारांना घरीच क्वारंटाईन करण्यास भाग पाडण्यात आलं आहे, तर अनेक जण संसर्गामुळे बाहेर न जाण्याचा स्वतःचा निर्णय घेत आहेत.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या