शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 19:49 IST

चीनी सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे अॅपलच्या सर्वात मोठ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Corona in China: जगात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असतील, पण चीनमध्ये कोरोना पुन्हा पाय रोवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे तेथील सरकारकडून झिरो कोव्हिड पॉलिसीअंतर्गत निर्बंध आणि लॉकडाऊन लादले जात आहेत. झेंगझोऊ शहरातही हीच परिस्थिती आहे, ज्यामुळे अॅपलच्या कारखान्यातून कर्मचारी पळून जात आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल चीनमध्ये अॅपल आयफोन तयार करणारा फॉक्सकॉनचा सर्वात मोठा कारखाना आहे. सरकारने लादलेले निर्बंध टाळण्यासाठी या कारखान्यातील कामगार कंपाउंड वॉलवरुन उड्या मारुन पळ काढत आहेत. कोरोनाबाबत चीनी सरकारने लादलेले निर्बंध कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचा विषय ठरत आहेत. याचाच परिणाम म्हणून कर्मचारी कुंपनावरुन उड्या मारुन पळ काढत आहेत.

कर्मचाऱ्यांचे पलायन चीनच्या मध्य हेनान प्रांतातील झेंगझोउ शहरातील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये 200,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांना काही काळापासून तेथे राहण्यास समस्या येत आहेत. शहरात कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अॅपलच्या या कारखान्यातील कामगार कारखान्यातून पळताना दिसत आहेत.

चीनची कोव्हिड झिरो पॉलिसीब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या कोव्हिड झिरो पॉलिसीअंतर्गत जिथे-जिथे कोरोनाचे नवीन प्रकरण समोर येत आहे, तिथे पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात आहे. या धोरणांतर्गत मोठी लोकसंख्या असलेल्या झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फॉक्सकॉनचा हा प्लांट बाधित जिल्ह्याच्या जवळ आहे. अशा स्थितीत प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आधीच कोरोनाच्या निर्बंधांना सामोरे गेलेले लोक पुन्हा निर्बंध टाळण्यासाठी तेथून पळ काढत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयApple Incअॅपल