शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनामुळे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीला बसला मोठा फटका; तब्बल 5 अब्ज डॉलर्सचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:09 IST

Corona Virus And Zhong Shanshan : चीनमध्ये देखील आता कोरोनाची दहशत पाहायला मिळाली असून शेअर बाजारावर सर्वात वाईट परिणाम झाला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. चीनमध्ये देखील आता कोरोनाची दहशत पाहायला मिळाली असून शेअर बाजारावर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअर पडले आहेत. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल 5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 

झोंग शानशैन (Zhong Shanshan) असं चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे. हाँगकाँगच्या शेअर मार्केटमध्ये शानशैनची कंपनी नोंगफू स्प्रिंग कंपनीच्या (Nongfu Spring Co.) शेअरमध्ये 9.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच्या कंपनी लिस्ट झाल्यानंतर 18 महिन्यांतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, त्यांच्या एकूण संपत्तीत 5 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 382.5 अब्ज रुपयांची कमी आली आहे. मात्र तरी देखील आताही ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 

परिस्थिती गंभीर! चीनच्या 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; लॉकडाऊनमुळे 1.7 कोटी लोक घरातच बंद

नोंगफू स्प्रिंग कंपनी लिमिटेडचा शेअर गेल्या 5 दिवसांत 14.34 टक्क्यांनी खाली आला आहे. झोंग शानशैन व्यतिरिक्त चीनच्या इतर अनेक श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीत देखील घट झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. शेनझेन शहरात कोरोना लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शहरात राहणारे 1.7 कोटी लोक त्यांच्या घरात बंद झाले आहेत. चीनच्या स्थानिक प्रशासनाने प्रथमच कोरोना रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. 

शाळा आणि उद्याने बंद

शांघायमध्ये शाळा आणि उद्याने बंद करण्यात आली आहेत, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले. हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅमने यांनी या भागात कोविड संसर्गाची लाट अद्याप शिगेला पोहोचली नसावी. ते म्हणाले की, यावेळी आपण संक्रमणाचा सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे, असे म्हणणे सोपे जाणार नाही, आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनMONEYपैसा