शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भयानक संकटामुळे जगभरात आणीबाणी जाहीर, जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:10 IST

जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते.

जीनिव्हा : चीनमधून जगातील बारापेक्षा अधिक देशांत कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या चीनमध्ये २१३वर पोहोचली असून, कोरोनाग्रस्तांची संख्या ९,६९२ आहे. दिल्लीत आणखी ६ जणांना कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अन्य देशांतही कोरोनाची लागण झाल्याने जागतिक आणीबाणी जाहीर करीत आहोत. आरोग्यसुविधा नसलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजू शकतो, हा चिंतेचा विषय आहे. चीनवरील अविश्वासामुळे आणीबाणी जाहीर केलेली नाही.

जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते. मात्र, विषाणूचा फैलाव झालेल्या देशांत नागरिकांना पाठविण्यास व व्यापारावर नियंत्रणे येतील. चीनच्या काही शहरांत जाणारी विमानसेवा अनेक कंपन्यांनी स्थगित केली आहे. मॅकडोनाल्ड, स्टारबक्स यांनी चीनमधील दुकाने बंद ठेवली आहेत.

कोरोनाग्रस्त वुहानमधील भारतीयांना आणण्यास ४३२ आसन क्षमतेचे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी दिल्लीहून रवाना झाले. या विमानात पाच डॉक्टर आहेत. विमान कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी थेट संपर्क होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. भारतीयांना घेऊन हे विमान शनिवारी पहाटे परतेल.चीनही पाठविणार विशेष विमानेवुहानमधून विदेशात गेलेल्या व कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी चीन अन्य देशांत विमाने पाठविणार आहे.हुबेई प्रांत व वुहानमधील सार्वजनिक वाहतूक कोरोना संकटामुळे २३ जानेवारीपासून स्थगित केली आहे. सुमारे ५० लाख लोक चीनमध्ये अन्यत्र वा विदेशात गेले आहेत. या विषाणूच्या प्रसारामुळे या नागरिकांना विदेश किंवा चीनच्या अन्य भागांत त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना