शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हेडफोन, इअरबड्सचा सतत वापर तुम्हाला बहिरे करणार! जगभरातील एक अब्जाहून अधिक मुलांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:26 IST

कानाला सतत लावलेले इअरबड्स किंवा हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, खूप गोंगाट असलेल्या संगीत कार्यक्रमांना aहजेरी लावणे या गोष्टींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुले व युवकांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका  आहे

वॉशिंग्टन : कानाला सतत लावलेले इअरबड्स किंवा हेडफोन, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, खूप गोंगाट असलेल्या संगीत कार्यक्रमांना aहजेरी लावणे या गोष्टींमुळे जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुले व युवकांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका  आहे असे एका पाहणी अहवालात म्हटले आहे. बीएमआय ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात या अहवालावर आधारित लेख प्रसिद्ध झाला आहे. ही आरोग्यविषयक गंभीर समस्या असून, तिच्या नियंत्रणासाठी  ठोस धोरणे आखण्याची गरज आहे.

आनंद मिळेल, मात्र...nबीएमआय ग्लोबल हेल्थ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये १२ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले, युवकांचा समावेश होता.nगाणी किंवा कार्यक्रम ऐकल्याने मनाला आनंद मिळतो. मात्र, मोठ्या आवाजात सतत गोष्टी ऐकत राहिले तर त्याचा श्रवणशक्तीवर परिणाम होतो. nत्यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पण, या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, हे चुकीचे असल्याचे या पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. 

आरोग्य संघटनेने म्हटले आहे की,  युवावर्ग स्मार्टफोन, हेडफोन, इअरबड्स अशा गोष्टींचा सातत्याने वापर करतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. या गोष्टींमुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.हेडफोन, इअरबड्स वापरणारे ध्वनीची पातळी १०५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवून कार्यक्रम, गाणी ऐकतात. संगीत कार्यक्रमात ध्वनीची पातळी १०४ ते ११२ डेसिबलच्या दरम्यान असते. प्रौढ व्यक्तींनी ८० डेसिबल व लहान मुलांनी ७५ डेसिबल इतकी ध्वनीची पातळी राखून कार्यक्रम काही काळच ऐकले पाहिजेत.  

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय