शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! जगातील सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांत सत्यजित रे यांचा ‘पाथेर पांचाली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:50 IST

जगभरातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांत भारतातील अन्य भाषांतील सोडाच; पण हिंदी भाषेतीलही चित्रपटाला स्थान मिळालेले नाही.

नवी दिल्ली : बीबीसीने २१ व्या शतकातील जगभरातील विदेशी भाषांतील (इंग्रजी वगळता) सर्वोत्कृष्ट १०० चित्रपट कोणते, हे निश्चित करण्यासाठी सर्व देशांतील काही समीक्षकांचा पोल घेतला. त्या १०० चित्रपटांत भारतातील एकच चित्रपट त्यात असून, तोही ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अतिशय गाजलेला ‘पाथेर पांचाली’ हाच आहे.जगभरातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांत भारतातील अन्य भाषांतील सोडाच; पण हिंदी भाषेतीलही चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. पाथेर पांचाली हा बंगाली चित्रपट भारतात १९५५ साली प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये १५ व्या स्थानी आहे.बीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांत पहिल्या स्थानावर अकिरा कुरोसावा यांचा ‘सेवन सामुराई’ या जपानी चित्रपटाची नोंद झाली आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला आहे. या पोलमध्ये जपानच्या सहापैकी एकाही समीक्षकाने मत दिले नाही. मात्र, अन्य सर्व देशांच्या समीक्षकांनी त्याला हमखास मते दिली.फ्रेंचमधील २७ फिल्म्सबीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांच्या यादीत फ्रेंचमधील तब्बल २७ चित्रपट आहेत, तर इटालियन व मँडरिनमधील प्रत्येकी ११ चित्रपट आहेत. बीबीसीने २४ देशांतील १९ भाषांमध्ये चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ६७ दिग्दर्शकांचे १०० चित्रपट निवडले आहेत. या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांच्या यादीतील केवळ ४ चित्रपटांचे दिग्दर्शन महिलांनी केले आहे. प्रत्यक्षात पोलमध्ये महिला समीक्षकांचे प्रमाण ४५ टक्के होते, हे विशेष!

टॅग्स :cinemaसिनेमा