अमेरिका आणि इराणमधील ऐतिहासिक शांतता चर्चेचे यजमानपद भूषवणारा पाकिस्तान सध्या हाय-अलर्टवर आहे. या हाय-प्रोफाईल बैठकीसाठी सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसर सोडू नये म्हणून पाकिस्तानने चक्क आपली JF-17 थंडर आणि F-16 ही लढाऊ विमानं मध्य पूर्वेत धाडली आहेत. इराणच्या प्रतिनिधी मंडळाला हवाई सुरक्षा कवच पुरवण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले असून, या मोहिमेला "ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट" असे नाव दिले आहे.
पाकिस्तानला काहीही करून ही डील पूर्णत्वास न्यायची आहे. जगात दहशतवादामुळे झालेली नाचक्की काही प्रमाणात का होईना भरून काढायची आहे. इराणचे चर्चेसाठीचे नेते अद्याप इराणलाच आहेत. ते या चर्चेसाठी येतील की नाही याबाबत काहीच सांगता येत नाहीय. अमेरिकेने शस्त्रसंधी केलेली असली तरी इस्रायल लेबनानवर हल्ले करत आहे. यामुळे चर्चेत जर लेबनॉनवरील हल्ले थांबविणे असेल तरच आम्ही येणार असे इराणने जाहीर केले आहे. अमेरिका आपण असा शब्द दिलेला नाही असे सांगत आहे. या परिस्थितीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स इस्लामाबादला येण्यासाठी निघाले आहेत.
फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, पाकिस्तानची लढाऊ विमानं इरानच्या बंदर अब्बास शहराजवळ तैनात करण्यात आली आहेत. इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादकडे रवाना होताना ही विमानं त्यांना एस्कॉर्ट करतील. या ताफ्यासोबत हवेतच इंधन भरण्यासाठी IL-78 रीफ्युलिंग टँकर आणि हवाई रडार यंत्रणा देखील तैनात करण्यात आली आहे. इराणचे हवाई दल युद्धामुळे कमकुवत झाल्याने, त्यांच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता पाकिस्तानच्या हवाई दलाने स्वीकारली आहे.
इस्रायलच्या हल्ल्याची भीती?पाकिस्तानला भीती आहे की, या ऐतिहासिक चर्चेत अडथळा आणण्यासाठी किंवा इराणी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायल काहीही 'साहस' करू शकतो. गेल्या काही काळात इस्रायल आणि इराणमधील संबंध विकोपाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पर्शियन आखातापासून सौदी अरेबिया आणि यूएईच्या सीमेपर्यंत आपले हवाई सुरक्षा जाळे विणले आहे.
इस्लामाबाद बनले 'किल्ला'केवळ हवेतच नव्हे, तर जमिनीवरही कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. इस्लामाबादमध्ये सध्या संपूर्ण लॉकडाऊन असून १०,००० सैनिकांच्या तुकड्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स या चर्चेसाठी आधीच इस्लामाबादकडे रवाना झाले आहेत. १९७९ च्या इराण क्रांतीनंतर ही दोन्ही कट्टर शत्रू देशांमधील सर्वात उच्चस्तरीय बैठक असणार आहे.
Web Summary : Pakistan provides air cover for Iran-US talks with JF-17s and F-16s, fearing Israeli disruption. Operation Iron Escort secures representatives as US Vice President arrives in Islamabad. Security is heightened both in the air and on the ground.
Web Summary : पाकिस्तान ने ईरान-अमेरिका वार्ता के लिए JF-17 और F-16 विमानों से हवाई सुरक्षा प्रदान की, इजरायली व्यवधान का डर। ऑपरेशन आयरन एस्कॉर्ट प्रतिनिधियों को सुरक्षित करता है, अमेरिकी उपराष्ट्रपति इस्लामाबाद पहुंचे। जमीन और हवा दोनों जगह सुरक्षा बढ़ाई गई।