दोहा : अफगाणिस्तान सरकारसोबत शांतता चर्चेसाठी तालिबानने काही पूर्वअटी घातल्या असून त्यांच्या पूर्ततेखेरीज वाटाघाटी होऊ शकणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीतून आपल्या लोकांची नावे वगळण्यात यावीत, दोहा येथील राजकीय कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावे आदी अटींचा त्यात समावेश आहे. औपचारिक शांतता चर्चा सुरू होण्यापूर्वी तालिबानच्या सदस्यांनी येथे अफगाण शिष्टमंडळाशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)
शांतता चर्चेसाठी तालिबानच्या अटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 02:18 IST