शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये आजपासून संपूर्ण लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:38 IST

Lockdown: पंतप्रधान जॉन्सन यांची घोषणा; फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहील

लंडन : कोरोनाच्या नवसंकरित विषाणूने ब्रिटनमध्ये थैमान घातले असून, रोज मोठ्या संख्येने बाधित आढळून येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली आहे. बुधवारपासून ही टाळेबंदी अमलात येणार असून, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ती सुरू असेल. 

ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या नवसंकरित विषाणूचे अस्तित्व आढळून आले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने नाताळच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी टाळेबंदी जाहीर केली होती. अनेक देशांनीही खबरदारी म्हणून ब्रिटनकडे जाणारी वा तिकडून येणारी हवाई वाहतूक स्थगित केली. ब्रिटनमध्ये फायझर आणि ऑक्सफर्ड लसींनाही मान्यता देण्यात आली. ऑक्सफर्डच्या लसीचा डोस देण्याची मोहीमही सोमवारपासून सुरू झाली; परंतु असे असले तरी ब्रिटनमध्ये दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. 

जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत २७ हजार बाधित रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे, तसेच गेल्या मंगळवारी एकाच दिवसात ८० हजार लोकांना नव्या विषाणूची बाधा झाल्याचेही निदर्शनास आले. मृत्यूदरातही वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये यासाठी अखेरीस जॉन्सन यांनी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली. टाळेबंदी न केल्यास बाधितांच्या संख्येचे गुणोत्तर वाढत जाण्याची भीती आहे. 

 

नव्या कोरोना विषाणूचे ५८ हजार नवे रुग्ण नवसंकरित कोरोना विषाणूचे एका दिवसात ५८ हजार ७८४ नवे रुग्ण आढळल्याने इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे. साथ सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत एका दिवसात झालेली ही वाढ सर्वाधिक आहे. ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येण्याचा हा सलग सातवा दिवस आहे. या नवसंकरित कोरोचा प्रादुर्भाव वाढल्याने इंग्लंडमध्ये सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केले आहे. इंग्लंडमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या २७ लाख १३ हजार ५६३ इतकी आहे. देशातील कोरोना बळींची संख्या ७५ हजार ४३१ वर पोहोचली आहे.

नागरिकांना आधीच अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत असल्याची कल्पना आहे. नव्या कोरोनाला नियंत्रणात आणणे आत्यंतिक गरजेचे असून, नव्या लसी ते काम प्रभावीपणे करतील. ज्यांना बाधा होण्याची शक्यता आहे त्यांना लसी देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढीस लागेल. त्यामुळे पुढील महिन्यापासून कोरोनाबाधितांचा आलेख उतरणीला लागेल, अशी आशा आहे. तोपर्यंत टाळेबंदी लागू राहील.                                      -बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

नव्या टाळेबंदीतील नियम असे असतील...

n    लोकांनी केवळ औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडावे.n    घरातील एकाच सदस्याला बाहेर जाता येईल.n    प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पूर्णपणे बंद राहतील.n    घरातूनच कामाला प्राधान्य दिले जावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या