शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दहशतवादाविरुद्ध एकत्र या !

By admin | Updated: November 16, 2015 03:51 IST

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक पातळीवरून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेत ते बोलत होते

अंताल्या (तुर्कस्तान) : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक पातळीवरून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेत ते बोलत होते. तर इसिसविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला. जी-२० शिखर संंमेलनात सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या नेत्यांनी फ्रान्समधील हल्ल्याचा निषेध केला. मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे उभे राहायला हवे; कारण या जागतिक स्तरावरील प्रयत्नांची आज जेवढी गरज आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती. भारत फेब्रुवारी २०१६मध्ये ब्रिक्स समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी स्वीकारणार आहे तेव्हा दहशतवादाविरुद्ध लढा देणे हीच आमची प्राथमिकता असेल. तथापि, आजही दहशतवादाविरुद्धची लढाई हीच ब्रिक्स समूहाची प्राथमिकता असायला हवी. (वृत्तसंस्था)‘इसिस’च्या एका संशयित जिहादीने आत्मघातकी स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. या घटनेत चार पोलीस जखमी झाले. ही घटना सिरियाच्या सीमेनजीक दक्षिण-पूर्व तुर्कस्तानात घडली.शनिवारी उशिरा रात्री गाजियानतेप या शहरात पोलिसांनी एका अपार्टमेंटवर छापा मारला असता स्वत:च्या शरीराभोवती स्फोटके बांधलेल्या या अतिरेक्याने स्वत:ला उडवून दिले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अंकारा येथे १० आॅक्टोबर रोजी एका शांतता रॅलीत दोन आत्मघातकी स्फोट होऊन १०२ जण ठार झाले होते. त्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी हा छापा मारला होता. त्यातून हा प्रकार घडला.शिखर परिषदेवर दहशतीचे सावटतुर्कस्तानच्या अंताल्या शहरात प्रमुख जागतिक नेते जी-२० शिखर परिषदेसाठी एकत्र आले असताना ही घटना घडली. या परिषदेत दहशतवादाविरुद्धचा लढा हाच मुख्य विषय राहणार आहे. काल याच शहरात लष्कराने कारमधून जाणाऱ्या ‘इसिस’च्या चार संशयित अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. याशिवाय काल ‘इसिस’च्या सात संशयित अतिरेक्यांना अटक केली होती.अभूतपूर्व सुरक्षा फ्रान्समधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानमध्ये होत असलेल्या जी-२० परिषदेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अंताल्या येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी १२ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. इसिसला नेस्तनाबूद करणार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, इसिसला नेस्तनाबूद करण्याची मोहीम आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. तथापि, फ्रान्स हल्ल्यातील सूत्रधारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू. आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र आला तरच आपल्याला दहशतवादाविरुद्ध आक्रमकपणे लढता येईल. - ब्लादिमिर पुतीन, राष्ट्रपती, रशिया