शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

"यही समय है सही, समय है..."! PM मोदींचं पॅरीसच्या भूमीवरून फान्समधील भारतीयांना भावनिक अन् मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 00:55 IST

"आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'."

सध्या भारतात गुंतवणुकीची अभूतपूर्व संधी निर्माण होत आहे. आपण भारतात गुंतवणूक करा. आता सांगतोय, नंतर तक्रार करू नका की, मोदींनी सांगितलंच नव्हतं. आताच संधी आहे आणि मी तर लाल किल्यावरूनही सांगितले होते. 'यही समय है सही, समय है'. जो लवकर पोहोचेल त्याला अधिक फायदा होईल. जो उशरा येईल तो वाट पाहील. आता, संधी किती लवकर घ्यायची? हे मी तुमच्यावर सोडतो. त्यामुळे लवकर या आणि भारतात गुंतवणूक करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले आहे. ते पॅरीसमध्ये बोलत होते.

मोदी म्हणाले, माझा आपल्या आग्रह आहे की, आता आपल्याला भारतात गुंतवणुकीसाठीही संपूर्ण उत्साहाने समोर यावे लागेल. भारत पुढील २५ वर्षांत विकसित होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यात आपली भूमीकाही मोठी आहे. आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल. त्याच्याशी संबंधित संभावनांवर भारतात काम करा. 

भारत सरकार परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी कमिटेड -भारत सरकार परदेशात स्थाईक झालेल्या आणि येथे काम करत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसाठीही कमिटेड आहे. लढाईचे मैदान असो वा एखादी नैसग्रिक आपदा, भारत भारतीयांना संकटात पाहताच सर्वात पहिले अॅक्शनमध्ये येतो. आम्ही भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ताकत लावली आहे. परदेशात राहणारा भारतीय आमच्यासाठी तेवढेच महत्वाचा आहेत. जेवढा भारतात राहणारा भारतीय. असेही मोदी म्हणाले.फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्यांना मिळणार पाच वर्षांचा पोस्ट स्टडी व्हिसा -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये, अनेक भारतीय लोक संशोधनाशी जोडले गेले आहेत. आता त्यांना भारतीय इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकविणे सुलभ करण्यात आले आहे. तसेच, फ्रान्समध्ये पोस्ट मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताकडून पाच वर्षांसाठी पोस्ट स्टडी व्हिसा देण्यात येईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले. याच बरोबर, भारतात येण्याचा अर्थ हजारो वर्षांचा वासरा अनुभव करणे आहे, असेही मोदी म्हणाले.

मी परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला भारताचा राजदूत मानतो -मोदी म्हणाले, जेव्हा जग आपले कौतुक करते तेव्हा भारत मातेलाही मोठा आनंद होतो. मी परदेशात राहणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला भारताचा राजदूत मानतो. याशिवाय, मला माहीत आहे. भारतीय कुठे जरी असेल तरी ते भारतासाठीच विचार करतात. आपण येथे आहात पण आपले मन चंद्र यानाकडे लागले आहे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सInvestmentगुंतवणूकBJPभाजपाprime ministerपंतप्रधान