शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात कराची एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली; तीन मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:01 IST

कराची एक्स्प्रेस ही ट्रेन सिंध प्रांतातील खैरपुर जिल्ह्याच्या तांदो खान भागात आली असताना ही घटना घडली आहे.

पाकिस्तानमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास कराची एक्स्प्रेसच्या एका बोगीला भीषण आग लागली. यामध्ये चार मुलांसह सात जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. 

पोलिसांनुसार जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्यांने सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ऑक्टोबर 2019 मध्येही तेजगाम एक्स्प्रेसमध्ये अशीच आग लागली होती. या घटनेत 73 जणांचा मृत्यू झाला होता.

कराची एक्स्प्रेस ही ट्रेन सिंध प्रांतातील खैरपुर जिल्ह्याच्या तांदो खान भागात आली असताना ही घटना घडली आहे. पोलिसांनुसार सहा जणांचे मृतदेह ओळखता येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे. कराची एक्स्प्रेस कराचीहून लाहोरला जात होती. आग लागलेला कोच हा एसी होता. आग लागल्यानंतर काही वेळात ही ट्रेन तांदो खान स्टेशनवर थांबविण्यात आली. जवळपास ४० मिनिटांनी फायरब्रिगेडला आगीवर नियंत्रण मिळविता आले. 

एका ७० वर्षीय महिलेने आग लागल्याने जीव वाचविण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली, तिचाही मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाहीय. बोगी पुढील तपासासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfireआग