शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये विमान अपघातात सहवैमानिक, पोलिसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:12 IST

नेपाळच्या एव्हरेस्ट परिसरातील लुक्ला विमानतळावर रविवारी एक छोटेखानी प्रवासी विमान उड्डाण करीत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर धडकले.

काठमांडू : नेपाळच्या एव्हरेस्ट परिसरातील लुक्ला विमानतळावर रविवारी एक छोटेखानी प्रवासी विमान उड्डाण करीत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर धडकले. या अपघातात सहवैमानिक व दोन पोलीस ठार झाले आहेत.समीट एअर या कंपनीच्या विमानाला झालेल्या या अपघातात सहवैमानिक एस. धुंगाना, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामबहादूर खडका, रुद्रबहादूर श्रेष्ठ, असे तीन जण मरण पावले आहेत. रुद्रबहादूर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे चालक कॅप्टन आर.बी. रोकाया व कॅ. गुरुंग हे जखमी झाले. त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. विमानाने धडक दिलेली हेलिकॉप्टर्स मनांग एअर व श्री एअर या कंपन्यांची होती. लुक्ला विमानतळाला एव्हरेस्टवीर तेनसिंग-हिलरी यांचे नाव देण्यात आले आहे. येथील धावपट्टी फक्त ५२७ मीटर लांबीची आहे. (वृत्तसंस्था)..............