वॉशिंग्टन : सिरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना तोंड देत असलेल्या कोबाने शहराची अवस्था नाजूक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तथापि, अजूनही कोबाने शहराचा बराचसा भाग कुर्द सुरक्षा दलांच्या ताब्यात आहे.अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे वृत्तपत्र सचिव जॉन किर्बी यांनी म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटचे दहशतवादी कोबाने शहराला सतत धोकादायक बनले आहेत. आम्ही कुर्द सुरक्षा दलांच्या मदतीसाठी शहर आणि परिसरातील लक्ष्यांवर सतत हल्ले करीत आहोत. (वृत्तसंस्था)
कोबाने शहराची स्थिती नाजूक
By admin | Updated: October 23, 2014 04:48 IST