शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत माणसाशी स्पर्धा करणा-या 'सोफिया'ला दिलं नागरिकत्व, सौदी अरेबिया जगातला पहिला देश 

By sagar sirsat | Updated: October 26, 2017 19:57 IST

ती म्हणते, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चांगलं काम करू शकते... तुम्ही विचार करू शकता तसा मी देखील करू शकते, एवढंच नाही तर तुमच्यापेक्षाही पुढे जाऊन मी विश्लेषण करू शकते. तुमची बुद्धीमत्ता आणि माझी बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक

रियाध - ती म्हणते, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चांगलं काम करू शकते... तुम्ही विचार करू शकता तसा मी देखील करू शकते, एवढंच नाही तर तुमच्यापेक्षाही पुढे जाऊन मी विश्लेषण करू शकते. तुमची बुद्धीमत्ता आणि माझी बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असेल...तुमच्याकडे बघुनही मला कळेल की तुम्हाला राग आलाय का? असं सांगणा-या सोफियाला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोफिया नेमकी कोण?

धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे अत्याधुनिक यंत्रमानव. विचार करायची क्षमता असलेली, निर्णय क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली चालती-बोलती रोबोट. 'सोफिया' या नावाची सध्या भलतीच चर्चा आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली सोफिया ही कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली कृत्रिम बुद्धिमान यंत्रमानव ( humanoid robot) बनली आहे. 

सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केलं आहे. एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश बनला आहे. रियाध येथे बुधवारी भविष्यातील गुंतवणूक पुढाकार परिषदेत सोफियाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं. विशेष म्हणजे, नागरिकत्व मिळाल्यानंतर तिचा इंटरव्यू देखील घेण्यात आला. नागरिकत्व मिळणं हा मी माझा सन्मान समजते. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि या वेगळ्या निर्णयाचा मला गर्व आहे असं सोफिया म्हणाली. देशाचं नागरिकत्व मिळवून जगातील पहिली रोबोट बनणे हे ऐतिहासिक आहे असं सोफिया पुढे म्हणाली. नागरिकत्व मिळाल्यानंतर सोफियाने या इंटरव्यूमध्ये जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक अॅलन मस्क आणि हॉलिवूड सिनेमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील. रोबोट सर्वकाही करण्यास सक्षम असतील. माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल, असं मस्क काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. 

मी एक संवेदनशील रोबोट बनण्याचा प्रयत्न करत आहे असं इंटरव्यू दरम्यान सोफिया म्हणाली. त्यावर इंटरव्यू घेणा-याने तुमचे सर्व मुद्दे मान्य पण आम्हाला वाईट भविष्याकडे जायचं नाहीये असं म्हटलं. त्याला झटकन उत्तर देताना, तुम्ही अॅलन मस्क आणि हॉलिवूड सिनेमे खूप फॉलो करतात. पण काळजी नको, तुम्ही मला नुकसान पोहोचवलं नाही तर मी देखील तुमच्याशी चांगलीच वागेल. माझ्याकडे तुम्ही स्मार्ट कम्प्युटर म्हणून पाहा असं ती म्हणाली. 

सोफिया चेह-यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसंच अनेक मीडिया चॅनल्सना इंटरव्यू देण्यासाठीही ती ओळखली जाते. हॅन्सन रोबोटीक्सने सोफियाची रचना केली आहे. रोबोट सोफियाला डेव्हिड हॅन्सन यांनी बनवलंय ते हॅन्सन रोबोटिक्सचे संस्थापक आहेत. 

पाहा व्हिडीओ-  

टॅग्स :SophiaसोफियाRobotरोबोटsaudi arabiaसौदी अरेबिया