शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दशकाहून अधिक काळ अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांना नागरिकत्व, भारतीय ठरणार सर्वाधिक लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 07:24 IST

United States : नवे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजाराे भारतीय व्यावसायिकांना लाभ हाेणार आहे. राेजगारावर आधारित देशनिहाय ग्रीन कार्डधारकांची मर्यादा रद्द करण्याचे या विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे.

वाॅशिंग्टन : अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजाराे भारतीय व्यावसायिकांना फायदेशीर ठरणारा ‘अमेरिकन नागरिकत्व सुधारणा कायदा-२०२१’ सादर करण्यात आला आहे. एका दशकाहून अधिक कालावधीपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्यांना हा कायदा अमेरिकेचे नागरिकत्व प्रदान करणार आहे. नवे अध्यक्ष जाे बायडेन यांनी शपथविधी झाल्यानंतर २० जानेवारीलाच काही विधेयकांवर स्वाक्षरी करून मंजुरीसाठी पाठविले हाेते. त्यापैकीच हे एक विधेयक हाेते.नवे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजाराे भारतीय व्यावसायिकांना लाभ हाेणार आहे. राेजगारावर आधारित देशनिहाय ग्रीन कार्डधारकांची मर्यादा रद्द करण्याचे या विधेयकात प्रस्तावित करण्यात आले आहे. अमेरिकेत दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व हा कायदा मंजूर झाल्यास मिळणार आहे. आयटी क्षेत्रात भारतातून हजाराे जण अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा लाभ मिळेल. विविध प्रकारच्या व्हिसांची संख्याही ८० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. 

सुधारणांचा दृष्टिकाेन व्यापक, सर्वसमावेशकविधेयकाचा मसुदा तयार करणारे सिनेटर बाॅब मेनेंडेझ आणि लिंडा सांचेझ यांनी सांगितले, की इमिग्रेशन सुधारणांचा दृष्टिकाेन व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. हजाराे स्थलांतरितांनी या देशाच्या उभारणीसाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांना या देशात काेणत्याही भीतीविना राहता आले पाहिजे. त्यासाठी आत्ता ही ऐतिहासिक संधी आहे, असे ते म्हणाले. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाकडे संसदेच्या दाेन्ही सभागृहांमध्ये बहुमत आहे. मात्र, वरिष्ठ सभागृहात दहा रिपब्लिकन सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. तरीही विधेयक काेणत्याही अडथळ्याविना मंजूर हाेईल, अशी अपेक्षा आहे.

विधेयकाची वैशिष्ट्ये- आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ.- देशनिहाय ग्रीन कार्डधारकांची मर्यादा हाेणार रद्द.- स्थलांतरितांना सामाजिक सुरक्षा मिळणार.- एच-१बी व्हिसाधारकांच्या आश्रितांनाही कामाची परवानगी.- व्हिसासाठी प्रतीक्षा कमी हाेईल.

टॅग्स :Americaअमेरिका