शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीआयएचे हॅकिंग युनिट करू शकले नाही स्वत:च्याच माहितीचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 23:33 IST

इतिहासातील सर्वांत मोठी सायबर चोरी

वॉशिंग्टन : हॅकिंगच्या अत्याधुनिक पद्धती व सायबर शस्त्रे विकसित करणारी अमेरिकेतील गुप्तचर संस्था आपल्याच एका युनिटचे संरक्षण करण्यास अपयशी ठरली. गुप्त माहिती चोरी होत असताना त्यांना खबरही लागली नसल्याची माहिती पुढे आली आहे.गुप्तचर संस्थेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी डेटा चोरी असून, त्याबाबत एक अंतर्गत अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आपली सुरक्षा प्रणाली मजबूत करण्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, हे सर्व उणिवांमुळे आपल्या समोर आले आहे. सायबर सुरक्षेबाबतही यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.सिनेट गुप्तचर समितीचे वरिष्ठ सदस्य व सिनेटर रॉन वाईडन यांनी न्याय विभागाकडून हा सुधारित अहवाल प्राप्त केला आहे. यापूर्वी हा अहवाल यावर्षी सीआयएच्या हॅकिंग पद्धतीच्या चोरीसंबंधात पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यांनी मंगळवारी एका पत्रासह हा अहवाल जारी केला आहे. त्यांनी गुप्तचर संस्थेचे संचालक जॉन रेटक्लिफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संघीय गुप्तचर संस्थेकडे देशाची जी गुप्त माहिती आहे, तिच्या सुरक्षेसाठी काय केले जात आहे?२०१७ च्या अहवालात सीआयएने विरोधकांचे नेटवर्क हॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आधुनिक माध्यमांची चोरीचा तपास करण्यासंबंधी माहिती होती. येथील एका वृत्तपत्राने हा अहवाल सर्वप्रथम प्रकाशित केला होता.विकिलिक्सने सीआयएच्या विशेष सायबर गुप्तचर केंद्रातून तयार केलेल्या हॅकिंगच्या पद्धती प्राप्त केल्या आहेत. यापैकी ३५ पद्धतींबाबत विकिलिक्सने तपशीलवार माहिती जारी केली होती, असे २०१७ च्या अहवालात म्हटले आहे. २०१६ मध्ये झालेली ही इतिहासातील सर्वांत मोठी चोरी होती, असे मानले जात आहे. १८० गिगाबाईटपासून ३४ टेराबाईटची माहिती चोरी करण्यात आली होती. विकिलिक्सने एक वर्षानंतर ही माहिती उघड केल्यावरच गुप्तचर संस्थेला याबाबत कळाले. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून सीआयएच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडे पाहिले जात आहे.

टॅग्स :Americaअमेरिका