शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

'सापाची वाईन' करण्यासाठी तिनं ऑनलाइन मागवला साप अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:16 IST

साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे.

बीजिंग- चीन आणि इतर पूर्वेकडिल देशांमध्ये साप, सरडे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचा आहारात उपयोग होतो हे सर्वांना माहिती आहे. पण चीनमध्ये सापाचा उपयोग चक्क वाइन करण्यासाठी केला जातो. साप वाइनमध्ये भिजवून ही कथित वाइन तयार केली जाते. या वाइनला मागणीही फार असते. मात्र ही वाइन घरीच करण्याचा उपाय मात्र एका चीनी महिलेला चांगलाच महाग पडला आहे.चीनच्या उत्तरेकडील शांक्सी प्रांतामधील 21 वर्षिय महिलेने दक्षिणेकडील गुआंगडौ प्रांतातून एक साप मागवला. हा साप चीनमधील ई-कॉमर्सचे संकेतस्थळ झुआनझुआनवरुन तिने मागवला होता. मात्र अत्यंत विषारी साप घरामध्ये पोहोचता होताच तिला चावला आणि त्यातच या महिलेचा अंत झाला. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर साप घरपोच देणाऱ्या स्थानिक कुरिअर कंपनीने त्या खोक्यामध्ये काय होते याची कल्पना कंपनीला नव्हती असे सांगून आपली जबाबदारी ढकलली आहे. सापामुळे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.चीनमध्ये इ-कॉमर्सचा वापर करुन वन्यजीव विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विषारी सापांच्या विक्रीवरही सरकारचे लक्ष असते. मात्र झुआनझुआनसारख्या फारसे लक्ष नसणाऱ्या संकेतस्थळांचा आजही त्यासाठी वापर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. चीनमध्ये अजूनही वाईनमध्ये साप भिजत घालून वाइनचा वेगळाच एक प्रकार करण्याची पद्धती आहे. मात्र शांक्सी प्रांतातल्या महिलेला यामुळे प्राण गमवावे लागले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयchinaचीन