बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर पुन्हा मोठं आयात शुल्क आकारण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये भूकंप आला आहे. अमेरिकेनंतर आशियाई शेअर बाजार 5 टक्क्यांहून अधिकनी कोसळला आहे. चीनचा मुख्य बेंचमार्क इंडेक्स शांघाई कंपोझिट 5.58 टक्के आणि हाँगकाँगची प्रमुख बेंचमार्क इंडेक्स हँगसँग 3.31 टक्क्यांनी पडला आहे. यादरम्यान भारतीय शेअर बाजारही गडगडला आहे.बीएसईचा 30 शेअर असलेल्या प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये 310 अंकांची घट नोंदवली गेली असून, तो 38643च्या स्तरावर आहे. तर दुसरीकडे एनएसईचा 50 शेअरवाला प्रमुख इंडेक्स निफ्टी 95 अंकांची घट झाली असून, 11620च्या जवळपास आहे. चीनचा शेअर बाजारा सोमवारी 5.6 टक्क्यांनी कोसळून बंद झाला. चीनच्या सेन्सेक्समधली ही फेब्रुवारी 2016नंतरची सर्वात मोठी घट आहे. अमेरिकेकडून चीनवरच्या सामानावर आयात शुल्क वाढवण्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे शेअर बाजार कोसळल्याचं प्रमुख कारण तज्ज्ञा सांगतायत. त्यामुळे जगभरात शेअर बाजारात घट नोंदवली गेली असून, भारतातल्या शेअर बाजारावरही याचा परिणाम जाणवला आहे.
ट्रम्प यांच्या धमकीनं चीनचा शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 15:00 IST