शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! चीनची गायिका जेन झांग जाणूनबुजून झाली कोरोना पॉझिटिव्ह; कारण ऐकून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:44 IST

चिनी गायिका जेन झांग हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना पॉझिटिव्ह केल्याची घटना समोर आली आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकडेवारीने पुन्हा चिंता वाढवली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिनी गायिका जेन झांग हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना पॉझिटिव्ह केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर अनेकांनी चिनी गायिकेला ट्रोल केलं आहे. पण जेनने अखेर हे धक्कादायक पाऊल का उचलले ते जाणून घेऊया

चिनी गायिका जेन झांगने स्वत: सोशल मीडियावर कोरोना व्हायरसची लागण होण्याच्या आपल्या योजनेबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की, ती त्या घरात गेली जिथे कोविडची लागण झालेले लोक होते. यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसादुखी, ही कोरोनाची सामान्य लक्षणं जाणवत होती, परंतु ती एका दिवसात बरी झाली. लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी गायिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. आपल्या व्हिडिओचा विपरित परिणाम होत असताना पाहून गायिकेने सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्ट काढून टाकली आणि लोकांची माफीही मागितली.

जेन झांगने दिलेल्या माहितीनुसार, ती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संगीत कार्यक्रमाची तयारी करत आहे. डिसेंबरच्या अखेरीस होणाऱ्या संगीत कार्यक्रमात तिला कोरोना पॉझिटिव्ह व्हायचं नव्हतं म्हणून गायिकेने आधीच स्वतःला कोविड पॉझिटिव्ह केले. दरम्यान, जेन हा एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि तिचं चीनमधील संगीत क्षेत्रात मोठं नाव आहे. मात्र, सध्या तिचे चाहते जेनवर प्रचंड नाराज आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लाटे दरम्यान, लोक आता संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे. बीजिंग आणि शांघाई, सध्या ही दोन शहरे कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की लोक त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन