शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:27 IST

यातील विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात

बीजिंग : भगवद्गीता ही ‘ज्ञानाचे अमृत’ व ‘भारतीय संस्कृतीचा लघु इतिहास’ आहे. जी आधुनिक काळात लोकांना भेडसावणाऱ्या आध्यात्मिक, भौतिक समस्यांची उत्तरे देते, असे मत  चीनमधील विद्वानांनी व्यक्त केले आहे. भारतीय दूतावासाच्या वतीने बीजिंग येथे आयोजित ‘संगमम् - अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स’ परिसंवादात चीनमधील अनेक तज्ज्ञांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर  मते मांडली. ‘तत्त्वचिंतनाचा विश्वकोश’ असे गीतेचे वर्णन करत, यातील कालातीत विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात, असे सांगितले. 

गीतेमधून मानवी अस्वस्थता, संभ्रमाला उत्तर

झेजियांग विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर ओरिएंटल फिलॉसॉफी रिसर्च’चे संचालक प्रा. वांग झी-चेंग यांनी गीतेला ‘ज्ञानाचे अमृत’ म्हटले, “पाच हजार वर्षांपूर्वी रणांगणावर झालेला हा संवाद आजही मानवी अस्वस्थता आणि संभ्रमांना उत्तर देतो,” असे ते म्हणाले.

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात श्रीकृष्णाचा प्रभाव

या परिसंवादातील प्रमुख वक्ते होते ८८ वर्षीय प्रा. झांग बाओशेंग. त्यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषांतर केले आहे. ते म्हणाले,“भगवद्गीता भारताच्या आत्मिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. कर्तव्य, कृती आणि वैराग्य या संकल्पना आजही भारतीय जीवनाचे केंद्र आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात मला श्रीकृष्णाचा सजीव प्रभाव जाणवला.”

भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा

शेंझेन विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडियन स्टडीज’चे संचालक प्रा. यू लाँग्यु यांनी म्हटले की, “भारत हा महान संस्कृतीचा देश असून त्याचा तात्त्विक वारसा फार सखोल आहे.

चीनमधील विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा, त्यातून दोन्ही देशांतील समन्वय आणि जागतिक शांततेस हातभार लागेल.”  परिसंवादात स्वागत करताना भारतीय राजदूत प्रदीपकुमार रावत म्हणाले की, “ही परिषद रामायण परिसंवादाचा पुढचा टप्पा आहे.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhagavad Gita: Chinese scholars hail it as 'elixir of knowledge'.

Web Summary : Chinese scholars at a Beijing symposium lauded the Bhagavad Gita as an 'elixir of knowledge' and a guide to resolving modern spiritual and material problems. They emphasized its timeless wisdom and relevance to achieving balance in life, noting its profound influence on Indian culture.
टॅग्स :chinaचीन