शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 19:41 IST

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही.

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. चीनचं सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मधून (Global Times) तर आता थेट भारताला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. युद्ध झालंच तर भारताचा पराभव निश्चित आहे, असं 'ग्लोबल टाइम्स'मध्ये दावा करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दल आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत भारतानं सुचवलेल्या मुद्द्यांवर चीनकडून सहमती मिळू शकली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम आहे. 

''भारतानं एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की ज्यापद्धतीनं त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचं आहे ते प्रत्यक्षात होणं शक्य नाही. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर निश्चित स्वरुपात भारतानं पराभवासाठी तयार राहावं", असं 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकीय लेखात नमूद करण्यात आलं आहे. भारत आणि चीनमधील सीमावाद अजूनही कायम असून यामागे भारतीय बाजूनं संवादात चुकीची भूमिका हे कारण आहे. भारताच्या मागण्या वास्तविक पातळीवर अव्यवहारिक आहेत, असंही चीननं म्हटलं आहे. 

दोन्ही देशांमध्ये तब्बल ८ तास चर्चादोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) चूशुल-मोल्दो सीमा क्षेत्र परिसरात पार पडली.  कॉर्प्स कमांडर लेफ्टिनंट जनरल पीजीके मेनन आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियु लिन यांच्या नेतृत्त्वात दोन्ही देशांमध्ये जवळपास साठेआठ तास चर्चा झाली. 

चीनी सैनिकांकडून रास्तारोकोदेपसॉन्ग बुल्ज परिसरात काही ठिकाणांवर भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय सैनिकांना गेल्या वर्षापासूनच पारंपारिक पेट्रोलिंग पॉइंट असलेल्या पीपी-१०,११,११ए आणि १३ सोबतच देमचॉक सेक्टरमधील ट्रॅक जंक्शन चार्डिंग निंगलुंग नाला (CNN) पर्यंत पोहोचू दिलं जात नाहीय. चीनी सैनिकांनी या मार्गांमध्ये रास्ता रोको केलं आहे. 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगNarendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणाव