शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्गाचा चीनचा प्रस्ताव

By admin | Updated: June 18, 2015 08:53 IST

चीनमधील कुनमिंग शहर ते भारतातील कोलकता शहरापर्यंत हाय स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्याचा चीनचा प्रस्ताव असून, चीनच्या प्राचीन रेशमी

हायस्पीड रॅल्वे : रेशीम मार्गाचे पुनरुज्जीवन करणारकुनमिंग : चीनमधील कुनमिंग शहर ते भारतातील कोलकता शहरापर्यंत हाय स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्याचा चीनचा प्रस्ताव असून, चीनच्या प्राचीन रेशमी मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नातील हा एक टप्पा आहे. म्यानमार व बांगलादेशातून चीनचा हा सिल्क रूट जात आहे. चीनने अलीकडेच ग्रेटर मेकाँग उपविभाग तयार करण्याची कल्पना मांडली होती. त्यात बांगलादेश, चीन, भारत व म्यानमार असा बहुद्देशीय कॉरीडॉर प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यात पुढाकार अर्थातच चीनचा असेल. आम्हाला कुनमिंग ते कोलकता ही रेल्वेसेवा, तसेच ग्रेट मेकाँग उपविभागाचा विस्तार करायचा आहे. यामुळे म्यानमार व बांगलादेश यांचाही विकास होईल असे युनान प्रांतिक सरकारचे उपमंत्री ली जी मिंग यांनी सांगितले. आशियाई विकास बँकेकडून या प्रकल्पाला मदत मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. चीनमधील युनान प्रांत भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी वसला असून, या प्रांताचे भारत-चीन -भारत योजनेशी तसेच ग्रेट मेकाँग प्रकल्पाशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून कुनमिंग ते नवी दिल्ली विमानसेवा पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. -हा मार्ग २८०० कि. मी. चा असून, हा कॉरीडॉर विकसित झाल्यास सीमावर्ती व्यापार वाढेल, तसेच लोकांचे येणे-जाणेही वाढेल. -चीनने जुना सिल्क रूट विकसित करण्यासाठी ४० अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्धार केला असून, हा मार्ग विकसित झाल्यास १३२ अब्ज डॉलरचा व्यापार होईल असा चीनचा अंदाज आहे. -कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्ग सुरू होणे हा पहिला टप्पा आहे. या दोन्ही शहरांमधील अंतर ९२३ मैल (१४८५.४२ कि.मी.) आहे.